मिमिक्री प्रकरणामुळे दुखावलेल्या जगदीप धनखड यांना दर्शवला पाठिंबा
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तृणमूलच्या एका खासदाराने उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केल्याच्या प्रकारानंतर भाजपसह एनडीएच्या सर्व राज्यसभा खासदारांनी उपराष्ट्रपतींना पाठिंबा दर्शवत अनोखे आंदोलन केले. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या सन्मानार्थ एनडीएचे 109 सदस्य सभागृहात तासभर उभे राहिले.In honor of Jagdeep Dhankhad MPs of NDA stood for an hour in the Rajya Sabha
तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी संसदेच्या परिसरात उपराष्ट्रपतींची नक्कल करत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वादंग निर्माण झाले.
कल्याण बॅनर्जी हे 141 विरोधी खासदारांपैकी एक आहेत ज्यांना गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संसदेच्या सुरक्षा भंगावरील विधानाची मागणी केल्याबद्दल निलंबित करण्यात आले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App