रियासी हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर, गोळीबार सुरू असतानाही बस चालकाने दाखवल धाडस

वाचवले अनेकांचे प्राण; पंतप्रधान नरेंद्र मोदी परिस्थितीवर बारकाईन लक्ष ठेवून आहेत In front of CCTV footage of Riasi attack bus driver shows courage even as firing continues

विशेष प्रतिनिधी

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी झालेल्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी यात्रेकरूंच्या बसवर गोळीबार केला. यामुळे बस दरीत पडली. या घटनेत 33 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, जम्मूतील रियासी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या काही मिनिटांपूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये पांढरी बस स्पष्ट दिसत आहे. ती भक्तांना वैष्णोदेवीकडे घेऊन जात होती. रविवारी संध्याकाळी 6 वाजता बस कटराकडे जात असताना दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार सुरू केल्याचे या फुटेजमध्ये दिसत आहे.

यावेळी बस चालकाने धाडस दाखवत तेथून वाहन वेगात पळवताना दिसला. पण त्याच दरम्यान त्याला गोळी लागली. त्याचा बसवरील ताबा सुटला. नंतर बस दरीत पडली. त्याच्या धाडसामुळे या हल्ल्यात अनेकांचे प्राण वाचले. हे प्रवासी जखमी झाले. सर्व प्रवाशांचा खात्मा करणे हा दहशतवाद्यांचा उद्देश होता.

पीडितांसाठी हेल्पलाइन सुरू केली

रियासी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा शोध तीव्र करण्यात आला आहे. या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या यात्रेकरूंपैकी बहुतांश दिल्ली आणि उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. प्रशासनाकडून पीडितांसाठी 01991-245639, 01991-245076, 0191-2542000 हे हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.

या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी वेगाने शोध सुरू केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लष्कराच्या गणवेशात मास्क घातलेल्या दहशतवाद्यांनी भाविकांनी भरलेल्या बसवर हल्ला केला. या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी ड्रोनचा वापर करून शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. फॉरेन्सिक टीम जंगलात शोधात गुंतली आहे. एनआयएचे पथक रवाना झाले आहे. टीम प्रत्येक कोनातून तपास करत आहे. यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा म्हणाले की, पंतप्रधानांनी त्यांना परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

In front of CCTV footage of Riasi attack bus driver shows courage even as firing continues

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात