इमरान मसूद यांनी वाढविले प्रियंका गांधी यांचे टेन्शन, समाजवादी पक्षात जाण्याची तयारी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात किमान लाज राखावी ऐवढ्या जागा मिळविण्याचा कॉँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र, पश्चिम उत्तर प्रदेशात मुस्लिम समुदायात वर्चस्व असणारे काँग्रेसचे नेते इमरान मसूद यांनी टेन्शन वाढविले आहे. मसूद हे समाजवादी पक्षात जाण्याच्या तयारी असून प्रियंका गांधी समजावात असतानाही ते दाद देत नाहीत.Imran Masood raises Priyanka Gandhi’s tension, prepares to join Samajwadi Party

मसूद विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून समाजवादी पक्षात दाखल होणे काँग्रेससाठी हा मोठा झटका मानला जाईल.सहारनपूर, बिजनौर, मुरादाबाद, संभल, रामपूर, बरेली, अमरोहा, पीलीभीत, खेरी, शाहजहांपूर आणि बदायूं या मुस्लिम बहुल भागात काँग्रेसला या सर्व मतदारसंघांत जिंकण्याची खात्री होती.



मात्र, मसूद यांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयाने या भागात आणि उत्तराखंडमध्ये सहारनपूरशी लगत मतदारसंघात काँग्रेसचे नुकसान होऊ शकते. इमरान मसूद हे फार पूवीर्पासूनच सपमध्ये जाण्याच्या तयारीत होते. मात्र, काँग्रेसने त्यांचे मन वळविले होते.

इम्रान मसूद यांचे घराणे या परिसरातील एकमेव मुस्लिम राजकीय घराणे मानले जाते. सहारनपूर जिल्ह्यातील गंगोह येथील हे घराणे गंगोह घराणे म्हणून ओळखले जाते. त्यांचे चुलते रशिद मसूद हे खासदार आणि मंत्रीही होते. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून इमरान यांनी मुस्लिम समाजामध्ये मोठी पकड निर्माण केली आहे.

कॉँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी या उत्तर प्रदेशात कॉँग्रेसला पुन्हा संजीवनी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुस्लिम समाजाला आपल्याकडे जोडण्याचा प्रयत्न आहे. मात्र, मसूद यांच्यासारखा मुस्लिम समाजातील वजनदार नेता समाजवादी पक्षात गेल्यास मुस्लिमांचा एकमेव तारणहार पक्ष असल्याची मानसिकता होऊ शकते. त्यामुळे कॉँग्रेसला मोठा फटका बसणार आहे.

Imran Masood raises Priyanka Gandhi’s tension, prepares to join Samajwadi Party

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात