इम्रान खान यांना अटक होऊ शकते;  गृहमंत्री शेख रशीद खान यांचे मोठे वक्तव्य

विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : अविश्वास प्रस्तावावरील मतदानापूर्वी पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद खान यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांना अटक होऊ शकते, असे त्यांनी म्हटले आहे. Imran Khan could be arrested; Home Minister Sheikh Rashid Khan’s big statement

नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांना हटवण्याचा प्रस्ताव अविश्वास प्रस्तावावर नॅशनल असेंब्लीच्या अधिवेशनापूर्वी अध्यक्षांना हटवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. हा प्रस्ताव विरोधी पक्षाच्या एका सदस्याने मांडला आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष असद कैसर यांना हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पाकिस्तान सरकारने पंजाबचे राज्यपाल हटवले. नवीन राज्यपालांची घोषणा नंतर केली जाईल, असे सरकारने सांगितले. सध्या उपसभापती कार्यवाह राज्यपालांचा पदभार घेतात. असद कैसर अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवतील, पाकिस्तानमधील नॅशनल असेंब्लीचे कामकाज काही वेळाने सुरू होईल. मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान खानविरोधातील अविश्वास प्रस्तावासाठीचे अधिवेशन नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष असद कैसर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.



पाकिस्तानची संसद रविवारी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावर मतदान करणार आहे. इम्रान यांनी शनिवारी देशभरातील जनतेला रविवारी आंदोलन करण्याचे आवाहन केले. अविश्वास ठराव मांडणाऱ्या विरोधकांना देशद्रोही ठरवत त्यांनी रविवारी लोकांना रस्त्यावर उतरण्यास सांगितले. विरोधी पक्ष आपल्यावरील भ्रष्टाचाराची प्रकरणे दडपण्यासाठी सत्तेत येण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तत्पूर्वी, इम्रान यांनी लष्कराला तीन पर्याय (राजीनामा, अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाणे आणि लवकर निवडणूक) देण्याचा दावाही केला होता. नंतर लष्करानेच हा दावा फेटाळून लावला होता.

Imran Khan could be arrested; Home Minister Sheikh Rashid Khan’s big statement

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात