आता चक्क इंपोर्टेड बस बोटीतून झेलम नदीत जलपर्यटन, पर्यटकांना सुखद धक्का

विशेष प्रतिनिधी

श्रीनगर – जम्मू आणि काश्मिरच्या जलवाहतूक प्राधिकरणाने काश्मिरमधील झेलम नदीत जलपर्यटनाला चालना देण्यासाठी पहिली अलिशान नौका आयात केली आहे. या ३० आसनी ‘बस बोट’ची सध्या झेलम नदीत श्रीनगरमधील लासजन आणि चट्टाबल वीरदरम्यान चाचण्या सुरू आहेत.Imported bus boat in Zelum river

या बस बोटीशिवाय एका खासगी कंपनीनेही सफरीसाठी १२ आसनी नौका व बचाव नौका उपलब्ध करून दिली आहे. ‘बस बोट’ आणि बचाव नौका न्यूझीलंडच्या मॅक कंपनीकडून खरेदी केली आहे. तर १२ आसनी नौका अमेरिकेतून आणली आहे.



बस बोट मध्ये वातानुकूलित यंत्रणेसह संगीत व दूरचित्रवाणीचाही आनंद पर्यटकांना घेता येईल. त्याचप्रमाणे, त्यात दहा ते बाराजणांना बैठकही घेता येईल.काश्मिरची ओळख आणि वारसा असलेली झेलम नदीतील अनेक दशकांच्या वाहतूक संस्कृती पुनरु्ज्जीवित करण्याचा यामागील उद्देश आहे.

त्याचप्रमाणे, पंतप्रधान विकास कार्यक्रमातंर्गत निधी दिल्या जाणाऱ्या ‘स्वदेश दर्शन’ या योजनेतून नव्या नौकांची खरेदी करण्यात आली आहे.

Imported bus boat in Zelum river

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात