विरोधकांनी दिले पाकिस्तानच्या हातात कोलीत, भारतावर हेरगिरीचा आरोप करत पाकिस्तानचे पंतप्रधान


विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद: भारतातील विरोधकांच्या आरोपांचा फायदा मिळून आता पाकिस्तानच्या हातात कोलीत मिळाले आहे. विरोधकांनी पेगॅसिस स्पायवेअरच्या मुद्यावर आरोप सुरू केल्यावर आता पाकिस्ताननेही संयुक्त राष्ट्र संघात धाव घेतली आहे.Pakistan’s PM accuses India of spying, complained in UNO

पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भारताने हेरगिरी केली असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे.
संयुक्त राष्ट्र संघाने याबाबतची चौकशी करण्याची विनंती पाकिस्तानने केली असल्याचे परराष्ट्र खात्याने म्हटले.



पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन आदींसह १४ जागतिक नेत्यांचे फोन टॅप केल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले,

आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तांनुसार भारत सरकारने त्यांच्या देशातील नागरीक, पत्रकारांसह परदेशी नागरीक, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची इस्रायली स्पायवेअरच्या माध्यमातून हेरगिरी केली असल्याचे समजले. भारताच्या या कृत्याचा आम्ही निषेध करत आहोत

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता संयुक्त राष्ट्र संघाच्या संबंधित विभागांनी याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणातील तथ्य समोर आणावेत आणि हेरगिरीसाठी भारताला जबाबदार ठरवावे अशी मागणीही पाकिस्तानने केली आहे.

चीननेदेखील पेगॅसस हेरगिरी प्रकरणावर भाष्य केले आहे. चीनने या हेरगिरीचा निषेध केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी म्हटले की, सायबर हेरगिरी सगळ्याच देशांसाठी व्यापकपणे सुरक्षितेच्या दृष्टीने मोठे आव्हान आहे.

Pakistan’s PM accuses India of spying, complained in UNO

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात