Shambhuraj Desai : मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी महत्त्वाची बैठक, हैदराबाद गॅझेट शिंदे समितीकडे सुपूर्द

Shambhuraj Desai

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मराठा आरक्षण मंत्रिमंडळ बैठकीचे प्रमुख चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई (  Shambhuraj Desai ) तसेच अन्य मंडळींसोबत बैठक होणार आहे. त्या दिवशी या गॅझेट संदर्भात निवृत्त न्यायमूर्तींसोबत चर्चा होणार आहे. मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असल्याचेही शंभूराज देसाई यांनी सांगितले.

सुधाकर शिंदे समितीने शिष्टमंडळात असलेल्या सर्वांसोबत चर्चा केलेली आहे. प्रारुप तयार करण्याचे काम विधी आणि न्याय विभागाच्या सल्ल्याने आणि आवश्यकता भासल्यास वकिलांचे मत जाणून घेऊन त्यावर काम करणे सुरू असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले.



या बैठकीत समाजाच्या मागण्यांसंदर्भातही चर्चा केली. सातारा, हैदराबाद, मुंबई गॅझेट लागू करण्याची जरांगे यांची मागणी आहे. हैदराबाद संस्थानकडे जाऊन जे कागदपत्रे आणले आहेत. त्यावर काम करणे सुरू आहे.

देसाई म्हणाले की, आत्तापर्यंत मराठा आंदोलकांवर एकूण 616 गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 540 गुन्हे हे चार्जशीट झालेले आहेत. तर 28 गुन्हे हे मागे घेतलेत. त्यासोबतच 222 गुन्हे मागे घेण्याची शिफारस केल्याचे देसाई म्हणालेत.

Important meeting on Monday regarding Maratha reservation, Hyderabad Gazette handed over to Shinde Committee

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात