वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Salman Rushdie दिल्ली उच्च न्यायालयाने सलमान रश्दी यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या वादग्रस्त पुस्तकाच्या आयातीवर 1988 साली घातलेली बंदी उठवली आहे. बंदी घालणारी अधिसूचना अधिकारी सादर करू शकत नसल्यामुळे ती अस्तित्वात नाही असे गृहीत धरले पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती रेखा पल्ली आणि सौरभ बॅनर्जी यांच्या खंडपीठाने 5 नोव्हेंबरला हा निर्णय दिला होता.Salman Rushdie
Bhaskar Jadhav रामटेकमधील बंडखोरीवरुन भास्कर जाधवांनी काँग्रेसला सुनावले; ही काँग्रेसची नैतिक जबाबदारी नाही का?
हे प्रकरण कोर्टात कसे पोहोचले?
2019 मध्ये संदीपान खान नावाच्या व्यक्तीने या पुस्तकाच्या आयातीबाबत याचिका दाखल केली होती. संदीपन म्हणाले, त्यांनी ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकाची ऑर्डर दिली होती. मात्र सीमा शुल्क विभागाला 36 वर्षांपूर्वी जारी झालेल्या अधिसूचनेमुळे हे पुस्तक आयात करता आले नाही. परंतु ते कोणत्याही अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध नव्हते किंवा संबंधित अधिकाऱ्याकडे त्यासंबंधीची कागदपत्रेही नव्हती. यामुळे त्यांना कोर्टात धाव घ्यावी लागली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App