Amit Shah : महाविकास आघाडीचे सरकार आले, तर शेतकऱ्यांच्या जमिनी काढून वक्फ बोर्डाच्या नावावर करतील!!


विशेष प्रतिनिधी

शिराळा : कर्नाटकात हजारो वर्षांपूर्वी बांधलेली मंदिरे वक्फ बोर्डाच्या नावावर करायचा उद्योग चालू आहे. मुस्लिम मतांच्या लांगुलचालनासाठी तिथल्या काँग्रेस सरकारने धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रात जर चुकून माकून महाविकास आघाडीचे सरकार आले, तर इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी काढून ते वक्फ बोर्डाच्या नावावर करतील, असा गंभीर इशारा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी शिराळा मधल्या सभेत दिला. Amit shah said Waqf board made by the Congress party

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या प्रचारांचा झंझावात महाराष्ट्रात सुरू झाला आहे. पंतप्रधान मोदी धुळे आणि नाशिक मध्ये आहेत, तर अमित शहा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामधून प्रचाराची सुरुवात केली. केंद्र सरकारने वक्फ बोर्ड सुधारणा कायदा आणला, पण महाविकास आघाडीच्या शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांनी या कायद्याला विरोध केला. कर्नाटकात हजारो हेक्टर जमीन आणि जुनी मंदिरे वक्फ बोर्डाच्या घशात घालण्याचा उद्योग सुरू आहे. महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात आले, तर हाच उद्योग पवार + ठाकरे आणि काँग्रेस करतील. ते इथल्या शेतकऱ्यांच्या मौल्यवान जमिनी वक्फ बोर्डाच्या घशात घालतील, असा इशारा अमित शाह यांनी दिला. पण केंद्रातले मोदी सरकारने महाराष्ट्रातील महायुती सरकार हे घडू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले

– महाराष्ट्रात फडणवीसांना आणायचंय

अमित शाह यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. तसेच राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार यावे यासाठी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांनी आपल्या भाषणात बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावरही भाष्य केलं. 20 नोव्हेंब रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. त्यामुळे या दिवशी आपल्या सगळ्यांना निर्णायक भूमिका घ्यायची आहे. मी दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना आणायचं आहे, अशी इच्छा महाराष्ट्रातील जनतेची आहे, असे अमित शाह म्हणाले.

– पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले?

अमित शाह यांनी यावेळी जनतेला अनेक आश्वासनं दिली. शिराळ्याच्या भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचे मोठे स्मारक बनवू. शरद पवार यांच्याकडे 10 वर्षे सत्ता होती. त्यांनी महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी खोलली, असे अमित शाह यांनी सांगितले.

Amit shah said Waqf board made by the Congress party

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात