IMD Weather Alert : भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील चार दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुढील 48 तासांत उत्तर आणि उत्तर मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यापैकी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD Weather Alert for major rainfall in Mumbai Thane Palghar and Heavy Rainfall for Konkan Marathwada in Maharashtra
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील चार दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुढील 48 तासांत उत्तर आणि उत्तर मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यापैकी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यातल्या ५ दिवसाची (८ सप्टेंबर) पावसाची शक्यता …IMD,कोकण आणि मध्य महाराष्ट्र जोरदार पावसाची शक्यता .Please IMD Updates pic.twitter.com/0CHHmZGMXF — K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 4, 2021
राज्यातल्या ५ दिवसाची (८ सप्टेंबर) पावसाची शक्यता …IMD,कोकण आणि मध्य महाराष्ट्र जोरदार पावसाची शक्यता .Please IMD Updates pic.twitter.com/0CHHmZGMXF
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 4, 2021
राज्यात 7 सप्टेंबर रोजी ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, जालनासह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे.
Thunderstorm continuing over parts of interior Maharashtra: Moderate to intense spells of rain accompanied with thunder/lightning very likely to continue over Jalna, Parbhani, Hingoli, Latur ,Nanded, Aurangabad and Osmanabad during next 3-4 hours . pic.twitter.com/N8WOrmGdL4 — Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 4, 2021
Thunderstorm continuing over parts of interior Maharashtra: Moderate to intense spells of rain accompanied with thunder/lightning very likely to continue over Jalna, Parbhani, Hingoli, Latur ,Nanded, Aurangabad and Osmanabad during next 3-4 hours . pic.twitter.com/N8WOrmGdL4
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 4, 2021
कोकण पट्ट्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सातारा, पुणे, रायगड, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
IMD Weather Alert for major rainfall in Mumbai Thane Palghar and Heavy Rainfall for Konkan Marathwada in Maharashtra
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App