ममता बॅनर्जींनी आघाडीच्या सदस्यांना 31 डिसेंबरपर्यंत जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम करण्याचे आवाहन केले आहे. If you have courage contest elections against Prime Minister Modi from Varanasi BJPs challenge to Mamata Banerjee
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे भाजप नेत्या अग्निमित्रा पॉल यांनी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीत वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढण्याचे आव्हान दिले आहे.
इंडिया आघाडीच्या चौथ्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी वाराणसी मतदारसंघातून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. यानंतर अग्निमित्र पॉल यांची ही प्रतिक्रिया आली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, त्यांनी शुक्रवारी सांगितले की, ‘जागा वाटपापूर्वी, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींच्या जागी निवडणूक लढवण्याची ममता बॅनर्जी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी तसे करावे. तुम्हाला पंतप्रधान व्हायचे आहे ना? आमच्या मुख्यमंत्री पंतप्रधानांशी स्पर्धा करतील. बघूया त्यांच्यात किती हिम्मत आहे.
2019मध्ये प्रियंका गांधी वाराणसीतून पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढवण्याच्या चर्चेला वेग आला होता. पण काँग्रेसने अजय राय यांना हाय-प्रोफाइल मतदारसंघातून उमेदवारी दिली. इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर बॅनर्जी यांना प्रियंका गांधी यांच्या वाराणसीतून उमेदवारीबाबत विचारण्यात आले. त्या म्हणाल्या, ‘आम्ही सर्वच गोष्टी सांगू शकत नाही.’
इंडिया आघाडीच्या बैठकीदरम्यान, ममता बॅनर्जींनी आघाडीच्या सदस्यांना 31 डिसेंबरपर्यंत जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम करण्याचे आवाहन केले. टीएमसीच्या सूत्रांनी सांगितले की, राज्य पातळीवर जागा वाटप डिसेंबरच्या अखेरीस आणि जानेवारीच्या दुस-या आठवड्यात शीर्ष नेतृत्व स्तरावर निश्चित केले जाईल यावर मोठ्या प्रमाणात सहमती झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App