‘मोटिव्हेशनल स्पीकर’ विवेक बिंद्रावर पत्नीने घरगुती हिंसाचाराचा केला आरोप!

  • नोएडाच्या सेक्टर-126 पोलिस ठाण्यात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: ‘मोटिव्हेशनल स्पीकर’ विवेक बिंद्रा विरोधात नोएडाच्या सेक्टर-126 पोलिस ठाण्यात पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Wife accuses motivational speaker Vivek Bindra of domestic violence

पोलिसांनी याबाबत माहिती दिली की, विवेक बिंद्राविरुद्ध त्याची पत्नी यानिकाचा भाऊ वैभव क्वात्रा यांनी तक्रार दाखल केली आहे. त्याने सांगितले की, विवेक बिंद्राने यानिकाला मारहाण केली. मारहाणीनंतर यानिकावर अनेक दिवस दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यानिकाच्या शरीरावर खोल जखमा आहेत.



ही घटना नोएडाच्या सेक्टर 94 मधील सुपरनोव्हा वेस्ट रेसिडेन्सीमध्ये घडली, जिथे ते राहतात. ७ डिसेंबरला सकाळी बिंद्रा आणि त्यांची आई प्रभा यांच्यात जोरदार वाद झाला. यानिका मध्यस्थी करण्यासाठी पुढे आल्या असता बिंद्राने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात यानिकाला दुखापत झाल्याची माहिती आहे.

एफआयआरनुसार, बिंद्राने कथितरित्या यानिकाला एका खोलीत नेले, तिचे केस ओढले आणि तिच्यावर हल्ला केला. बिंद्राने त्याचा फोनही तोडला. यानिकाला एवढी मारहाण करण्यात आली की तिच्या कानाचा पडदाही फाटला, असा आरोप आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

Wife accuses motivational speaker Vivek Bindra of domestic violence

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात