विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीत यशस्वी ठरलेला मोफत वीजेचे वचन आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी पंजाबसाठीही लागू केले. पुढील वर्षी विधानसभा निवडणुकीत आपची सरशी झाल्यास पंजाबला मोफत वीज देऊ असे त्यांनी ट्विटरवरून जाहीर केले. If you get power, you will implement free electricity fund in Punjab also
आम आदमी पक्षाने आता पुन्हा पंजाबमध्ये बस्न बसवण्यास सुरुवात करण्याचे मनसुबे आखले आहे. पंजाब व गुजरातवर पक्ष लक्ष देणार असल्याचे केजरीवाल यांनी जाहीर केले आहे. पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल उद्या चंडीगडला भेट देणार आहेत. त्यांनी पंजाबीत ट्विट केले आहे. त्यांनी महागाईमुळे पंजाबमधील महिलांनी आनंद गमावल्याचा दावा केला. त्यांनी म्हटले आहे की, दिल्लीत आम्ही प्रत्येक कुटुंबाला दोनशे युनिट वीज मोफत देतो. त्यामुळे महिला आनंदात आहेत. आपचे सरकार आल्यास ते पंजाबमध्ये वीज मोफत पुरवेल. उद्या तुमची भेट घेण्यास मी आतुर आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App