विशेष प्रतिनिधी
मुंबई : गरीबांचे स्वप्न पूर्ण झाले, लाखो लोकांना स्वत:चे घर मिळाले. तुमचे एक मत गरीब आणि गरजू लोकांचे प्राण वाचवू शकते. कारण योगी जिंकतील, तर यूपी जिंकेल, असे प्रसिध्द अभिनेत्री कंगना रनौटने म्हटले आहे.If Yogi wins, UP will win, Kangana appealed to voters
कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तिने पाठिंबा दिला आहे. गरिबांचे स्वप्न पूर्ण झाले, लाखो लोकांना स्वत:चे घर मिळाले. तुमचे एक मत गरीब आणि गरजू लोकांचे प्राण वाचवू शकते कारण योगी जिंकतील, तर यूपी जिंकेल, असे कॅप्शन कंगनाने दिले आहे. कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
कंगना सध्या लॉक अप या तिच्या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. बुधवारी या शोचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या शोमध्ये कंगना ही त्या लॉक अपवर लक्ष ठेवणार असून तिचे नियम या लॉक अपमध्ये लागू असतील. कंगनाचा हा शो खूपच बोल्ड आणि वादग्रस्त असणार आहे, कारण यामध्ये सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून येणार आहेत.
लॉक अपमध्ये १६ विवादांमुळे चर्चेत असलेले सेलिब्रिटी असणार आहेत. हे ७२ दिवस या लॉक अपमध्ये राहतील. यावेळी त्यांना कोणतीही सुविधा दिली जाणार नाही. त्यांना अशा लोकांसोबत तिथे ठेवण्यात येणार आहे,
ज्यांच्यासोबत ते एक मिनिटही राहू शकत नाही. तर शोमध्ये टिकून राहण्यासाठी सेलिब्रिटींना त्यांचे डार्क सिक्रेट्स संपूर्ण जगाला सांगावे लागतील. हा शो २७ फेब्रुवारी रोजी ऑल्ट बालाजी आणि एमएक्स प्लेयर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लाइव्ह पाहता येणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App