वृत्तसंस्था
लंडन : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष आदर पूनावाला सध्या लंडनमध्ये असून काही दिवसांतच भारतात परतेन, असे ट्विट त्यांनी केले आहे. I will back in India soon – adhar poonawala
ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ब्रिटनमधील आमचे भागीदार आणि भागधारक यांच्याबरोबरील बैठक चांगली झाली. पुण्यात कोव्हिशिल्डचे उत्पादन जोरात सुरू आहे, हे सांगण्यास मला आनंद होत आहे. काही दिवसांनी भारतात परतल्यावर लस निर्मितीचा आढावा मी घेईन.
लंडनमधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पूनावाला यांनी व्यावसायिक कारणासाठी लंडनला आल्याचे सांगितले होते. भारताबाहेर ब्रिटनसह अन्य देशांमध्ये लस उत्पादन मोठ्या प्रमाणात करण्याचा विचार असून लवकरच त्याबाबत घोषणा केली जाईल, असे ते म्हणाले होते.
कोरोनाची दुसऱ्या लाट भारतात अधिक जीवघेणी ठरत असताना तेथे कोरोना प्रतिबंधक लशींची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी दबाव येत असून धमकीचे फोन येत असल्याचेही पूनावाला यांनी मुलाखतीत सांगितले होते.
कोव्हिशिल्ड लशीच्या पुरवठ्याबद्दल भारतातील काही प्रभावशाली व्यक्तींनी फोनवर बोलताना जहाल भाषा वापरली असेही ते म्हणाले. धमकीच्या फोनच्या तक्रारीनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांना ‘वाय’ श्रेणीतील सुरक्षा पुरविली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App