प्रेरणादायी : ऍसिड अटॅक मधून वाचलेल्या काफीला सीबीएससी परीक्षेत 95 % गुण, आयएएस होण्याची जिद्द!!


वृत्तसंस्था

चंडीगड : ऍसिड अटॅक मधून वाचलेल्या चंदीगडच्या काफी या मुलीने आपल्या जिद्दीने आणि मेहनतीने अभ्यास करून सीबीएससी परीक्षेत तब्बल 95 % गुण मिळवले आहेत. आता त्यापुढे जाऊन भारतीय प्रशासकीय सेवा आयएएस पास होण्याची तिची जिद्द आहे.I studied for 5-6 hours every day. My parents and teachers supported me a lot. I want to become an IAS officer and serve my country,”



काफी तीन वर्षांची असताना शेजारच्यांनी तिच्यावर ऍसिड हल्ला केला होता. त्या हल्ल्यात काफीचा चेहरा पूर्णपणे भाजला आणि तिला आपली दृष्टी गमवावी लागली. पण ती आणि तिचे आई-वडील जिद्द हरले नाहीत. त्यांनी जिद्दीने काफीला शिकवले आणि तिने देखील दररोज 5 ते 6 तास अभ्यास करून सीबीएससी परीक्षेत 95 % गुण मिळविले.

या दरम्यानच्या काळात कुटुंबाला खूप कठीण समस्यांना सामोरे जावे लागले. पण परमेश्वरावरची श्रद्धा आणि जिद्द या बळावर काफीने आपल्या संकटावर मात केली आणि जिद्दीने शिक्षण पुढे चालू ठेवले. त्यातला एक पडाव सीबीएससी परीक्षेत उत्तुंग गुण मिळवून पार झाला आहे. आता काही पुढचा अभ्यास करून आयएएस परीक्षा पास होण्याची जिद्द बाळगून आहे, असे तिचे वडील पवन यांनी सांगितले.

I studied for 5-6 hours every day. My parents and teachers supported me a lot. I want to become an IAS officer and serve my country,”

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात