लोक दारू का पितात हे कळत नाही, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पडला प्रश्न

विशेष प्रतिनिधी

पाटणा : दारू प्यायल्यास लोकांचा मृत्यू ओढवू शकतो. तो एक वाईट प्रकार आहे. मला कळत नाही लोक दारू का पितात, असा सवाल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला आहे.दारूबंदीच्या निर्णयावरून नितीश कुमार यांच्या सरकारवर गेल्या काही दिवसांपासून टीका केली जात आहे.I don’t know why people drink alcohol, Bihar Chief Minister Nitish Kumar had a question

त्यामुळे या निर्णयाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती.या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अवैध दारूमुळे घडत असलेल्या दुदैर्वी घटनांबाबत माध्यमांनी विचारणा करताच नितीश कुमार म्हणाले की दारुबंदीला विरोध करणारे ही गोष्ट विसरले आहेत का की हा निर्णय सगळ्यांच्या संमतीनंतरच घेण्यात आला आहे.



सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष असा कोणत्याही पक्षाने तेव्हा या निर्णयाला विरोध का केला नाही?या निर्णयाची योग्यप्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्याचं उल्लंघन रोखण्यासाठी आम्ही त्यातल्या चुका शोधून काढण्याचा प्रयत्न करू.

ऐन दिवाळीत बिहारच्या गोपाळगंज आणि बेतिया भागात विषारी दारू प्राशन केल्यानं ३१ जणांना आपले प्राण गमवावे लागलेहोते. गोपाळगंज भागात २० जणांचा मृत्यू झाला आहेत तर पश्चिम चंपारण जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या बेतियाच्या तेलहुआ गावात आत्तापर्यंत ११ जणांनी आपले प्राण गमावले आहेत.

तर विषारी दारुमुळे अनेकांची दृष्टी निकामी झाली आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात मुजफ्फरपूरमध्ये दारू पिल्यानंतर सहा जणांना आपला जीव गमवावा लागला होता.बिहारमधले विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव यांनी या मृत्यूंसाठी नितीश कुमार सरकारला जबाबदार धरले होते.

विषारी दारुमुळे बिहारमध्ये दिवाळीच्या दिवशी सरकारमुळे ३५ हून अधिक लोक मारले गेले. कुणाच्या तरी सनकेमुळे बिहारमध्ये लागू करण्यात आलेली दारुबंदी केवळ कागदांपुरती आहे. अन्यथा खुली सूट आहे कारण काळ्याधंद्यात मौज आणि लूट सुरूच आहे, असा आरोप त्यांनी केला होता.

I don’t know why people drink alcohol, Bihar Chief Minister Nitish Kumar had a question

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात