दिल्ली, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थानमध्ये हुडहुडी; हिमाचल, काश्मिरमध्ये बर्फवृष्टीने गारवाच गारवा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : उत्तर भारतात थंडीची जोरदार चाहूल लागली आहे. प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये हुडहुडी वाढली असून ती आणखी वाढेल, असा इशारा देण्यात आला आहे. थंडीच्या लाटेबाबत ऑरेंज अलर्ट, तर दिल्लीसाठी  यलो अलर्ट हवामान खात्याने दिला.cold snap in delhi Madhya Pradesh Punjab Rajasthan Snowfall in Himachal Kashmir

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीरमध्ये हिमवृष्टी सुरू आहे. दिल्ली, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, आदी राज्यांमध्ये तापमान खाली आले आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्लीमध्येथंडीचा जोर वाढला आहे.



येत्या चार-पाच दिवसांत दिल्लीतील तापमान ४ ते ५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.  नाताळनंतर दिल्लीमध्ये थंडी आणखी वाढुन तापमान हे १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी होईल..

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दिल्लीत बुधवारपर्यंत तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे. हिमवृष्टीमुळे मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये थंडी वाढली आहे. येत्या आठवड्यात सर्वत्र धुक्याचे साम्राज्य पसरण्याची शक्यता आहे.

Hudhudi in Delhi, Madhya Pradesh, Punjab, Rajasthan; Snowfall in Himachal, Kashmir

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात