यूपीत प्रियांका कसे आणणार महिलाराज??; काँग्रेसच्या उमेदवारीकडेच महिलांनी फिरवली पाठ!!

विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेत काँग्रेस पक्ष 40% महिला उमेदवारांना निवडणुकीत उतरवणार आहे, अशी चमकदार घोषणा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली खरी, पण राज्यामध्ये महिला उमेदवार शोधताना काँग्रेस नेत्यांच्या नाकीनऊ आले आहे…!! How will Mahilaraj bring Priyanka in UP ??; Women turn their backs on Congress candidature !!

काँग्रेस पक्षाने जाहीर आवाहन करून कार्यकर्त्यांना उमेदवारी मागण्यासाठी अर्ज करायला सांगितले होते. यामध्ये महिलांना प्रोत्साहन देखील देण्यात आले होते. परंतु संपूर्ण उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 403 जागा असून असताना फक्त 1700 कार्यकर्त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मिळवण्यासाठी अर्ज केले आहेत.

अर्थात पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी काँग्रेसने प्रत्येक अर्जासोबत 11 हजार रुपयांचे शुल्क भरण्याची अट ठेवली होती. पण तरी देखील 403 जागांसाठी फक्त 1700 च अर्ज आले आहेत म्हणजे काँग्रेसकडे उमेदवार निवडताना खूपच कमी चॉईस शिल्लक राहिल्याचे दिसत आहे. त्यातही महिला उमेदवारांची संख्या खूपच नगण्य आहे. अनेक मतदारसंघांमध्ये सिंगल डिजिटमध्ये महिला उमेदवारांची इच्छुकांची संख्या आहे.



त्यांच्या तर उमेदवारी निवडीसाठी अजिबात वाव नाही, असे दिसून येत आहे. त्यामुळे पक्षाचे विजयी उमेदवार कसे निवडायचे?, असे ठळक प्रश्नचिन्ह प्रदेश नेत्यांपुढे उभे राहिले आहे. टी.व्ही. 9 भारतवर्षने ही बातमी दिली आहे.

प्रियांका गांधी यांनी महिलांना 40% उमेदवारी देण्याची चमकदार घोषणा केली खरी, पण मुळातच इच्छुक उमेदवारांची संख्या कमी आणि त्यातही महिलांची संख्या आणखीनच कमी अशी स्थिती आल्यामुळे काँग्रेसची अवस्था राजकीयदृष्ट्या खिंडीत गाठल्यासारखी झाली आहे. काँग्रेसचे सगळे विरोधी पक्ष आता प्रियांका गांधी यांच्या 40% महिलांना उमेदवारी देण्याच्या घोषणेचे आणि त्यांना आलेल्या अपयशाचे राजकीय भांडवल करण्याची भीती काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांना वाटू लागली आहे.

How will Mahilaraj bring Priyanka in UP ??; Women turn their backs on Congress candidature !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात