मंगळवारी राज्यसभेत एका लेखी उत्तरात केंद्र सरकारने माहिती दिली की, कर्ज बुडवून फरार झालेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्याकडून आतापर्यंत 19,111.20 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.How much was recovered from debtors Vijay Mallya, Nirav Modi and Mehul Choksi? This information was given by the Central Government in Parliament
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मंगळवारी राज्यसभेत एका लेखी उत्तरात केंद्र सरकारने माहिती दिली की, कर्ज बुडवून फरार झालेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्याकडून आतापर्यंत 19,111.20 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, तीन फरारींनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची त्यांच्या कंपन्यांद्वारे पैशांची हेराफेरी करून फसवणूक केली, परिणामी कर्जदारांचे एकूण 22,585.83 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
ते म्हणाले की, “15 मार्च 2022 पर्यंत, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) कायद्यांतर्गत 19,111.20 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.” 19,111.20 कोटी रुपयांपैकी 15,113.19 कोटी रुपयांची मालमत्ता खासगी क्षेत्रातील बँकांकडे सोपवण्यात आली आहे. भारत सरकारने 335.06 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
पंकज चौधरी म्हणाले की, 15 मार्च 2022 पर्यंत, तीन प्रकरणांमध्ये, एकूण फसवणुकीच्या रकमेपैकी 84.61 टक्के मालमत्ता जप्त करण्यात आली आहे आणि बँकेच्या नुकसानीपैकी 66.91 टक्के रक्कम त्यांना परत करण्यात आली आहे किंवा त्यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. याशिवाय एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांच्या संघाने अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्याकडे सोपवलेल्या मालमत्तेच्या विक्रीतून 7,975.27 कोटी रुपये वसूल केले आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App