इम्तियाज जलील म्हणजे तोडपाणी बादशहा, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना यांचा आरोप


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद: एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे तोडीपाणी बादशहा आहेत, अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कदीर मौलाना यांनी केली आहे.एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादीला युती करण्याचा प्रस्ताव दिल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.Imtiaz Jalil is Todpani Badshah, State Vice President of NCP Kadir Maulanas allegation

तसेच या प्रस्तावानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून जलील यांच्यावर टीका केली जात आहे. कदीर मौलाना म्हणाले की, इम्तियाज जलील तोडीपाणी नेता असून, आम्ही त्यांचे नाव तोडीपाणी बादशहा ठेवले आहे. जलील अधिकाऱ्यांचे तोडीपाणी बादशहा, कंत्राटदारांचे तोडीपाणी बादशहा असून, त्यांचे अनेक प्रकरणे आम्ही समोर आणणार आहे.त्यामुळे जर आमचा पक्ष अशा लोकांसोबत हातमिळवणी करत असेल तर आम्हाला विचार करावे लागेल. जलील यांच्या आईच्या निधनाला दहा दिवस पूर्ण झाले नव्हते,पण कुणी सांत्वनासाठी आले असता त्यावेळी सुद्धा राजकीय प्लानिंग केली जाते हे खुपचं दुर्दैवी आहे.

मुळात जलील यांच्या पायाखालची जमीन सरकली असून,महानगरपालिका निवडणुका लागल्यावर आपल्या हातात काहीच येणार नसल्याची त्यांना भीती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या खांद्यावर हात ठेवून पुढील काही दिवस काढण्यासाठी त्यांचा आहे.

Imtiaz Jalil is Todpani Badshah, State Vice President of NCP Kadir Maulanas allegation

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय