भारताची निर्यात किती वाढली?, आयात किती घटली?; वाचा नीट आकडेवारी!!

Import export

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थिती असताना आणि जागतिक अर्थव्यवस्था मंदीचे हेलकावे खात असताना इतर मोठ्या देशांच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था स्थिर आणि सकारात्मक आहे, याचे प्रत्यंतर आज समोर आले.How much did India’s exports increase? How much did imports decrease

भारताची निर्यात किती वाढली? आणि आयात किती कमी झाली?, यांची आकडेवारी वाणिज्य मंत्रालयाने जारी केली. मे 2025 पर्यंत माल आणि सेवा क्षेत्रातील भारताची निर्यात 71.12 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचली. जी मे 2024 मध्ये 69.20 अब्ज डॉलर्स इतकी होती.



त्या तुलनेत भारताची आयात याच कालावधीत 78.55 अब्ज डॉलर्स वरून 77.75 डॉलर्स पर्यंत कमी झाली.

मे 2024 मध्ये भारताची आंतरराष्ट्रीय व्यापारी तूट 9.35 अब्ज डॉलर्सची होती. ती मे 2025 मध्ये घटून 6.62 अब्ज डॉलर्स पर्यंत कमी झाली.

चीन, अमेरिका, जर्मनी आणि जपान यांच्यासारख्या जागतिक अर्थव्यवस्था दोलायमान अवस्थेत असताना भारताने आपली अर्थव्यवस्था स्थिर राखली आणि व्यापारी तूट देखील घटवली त्याचबरोबर निर्यात वाढवून आयात कमी केली हे भारतीय अर्थव्यवस्थेचे यश मानले जात आहे.

How much did India’s exports increase? How much did imports decrease?; Read the statistics carefully!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात