जेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना ‘भारताचे जावाई’ असं संबोधलं जातं तेव्हा त्यांना कसं वाटतं?

 ऋषी सुनक हे पत्नी अक्षता मूर्तीसह  G20 परिषदेसाठी भारतात आले आहेत.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे G20 परिषदेसाठी भारतात आले आहेत. ऋषी सुनक म्हणाले की, G20 शिखर परिषदेसाठी त्यांची नवी दिल्ली भेट खूप खास आहे. ते भारतीय वंशाचे पहिले ब्रिटिश पंतप्रधान आहेत. 43 वर्षीय ऋषी सुनक यांनी भारतीय अक्षता मूर्तींशी लग्न केले आहे.  त्यामुळे त्यांना गमतीने ‘भारताचा जावई’ असेही संबोधले जाते. How does British Prime Minister Rishi Sunak feel when he is called Indias son in law

नवी दिल्लीला जाणाऱ्या विमानात पत्रकारांशी संवाद साधताना ऋषी सुनक म्हणाले की, ते भारतात जाण्यासाठी खूप उत्सुक आहेत. ते म्हणाले, “भारत हा असा देश आहे, जो मला खूप जवळचा आणि प्रिय आहे.” या दौऱ्यात त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी देखील आहे. G20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चेचा कार्यक्रमही आहे.

तीन दिवसांच्या दौऱ्यावर निघताना ऋषी सुनक यांनी ट्विट केले, “G20 शिखर परिषदेबाबत माझे मुद्दे स्पष्ट आहेत. माझे लक्ष जागतिक अर्थव्यवस्था स्थिर करणे, आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण करणे आणि सर्वात असुरक्षित लोकांना आधार देणे यावर आहे.”

ऋषी सुनक यांना ‘भारताचा जावई’  संबोधण्याबद्दल विचारले असता ते हसत म्हणाले, “मी कुठेतरी ऐकले आहे की मला ‘भारताचा जावई’ म्हटले गेले आहे. मला आशा आहे की ते प्रेमाने म्हटले गेले आहे. जेव्हा जेव्हा मी ते ऐकतो तेव्हा मला खूप विशेष वाटते.

How does British Prime Minister Rishi Sunak feel when he is called Indias son in law

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात