काँग्रेस स्वतः बुडत आहे आणि सहकारी मित्र पक्षांनाही सोबत बुडवत आहे, असंही म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
वाराणसी : Ravi Kishan महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणूक निकालांमध्ये महायुतीला महाराष्ट्रात प्रचंड बहुमत मिळाले असताना, झारखंडमध्ये इंडिया आघाडी परतली आहे. पण, विरोधकांना महाराष्ट्राचा पराभव पचवता आलेला नाही. विरोधक ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत.Ravi Kishan
यासंदर्भात गोरखपूरचे खासदार रवी किशन यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, देशातील जनता पाहत आहे. हे लोक अशिक्षित लोकांसारखे बोलत आहेत. झारखंडमध्ये निवडणूक जिंकली तर इव्हीएम ठीक आहे. महाराष्ट्रात निवडणुका हरल्या तर ईव्हीएममध्ये बिघाड आहे. राजकारणाचा स्तर घसरत चालला आहे. काँग्रेस आणि समस्त विरोधकांनी अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत. भाजपच्या स्ट्राईक रेटसमोर काँग्रेस संपली आहे. काँग्रेस स्वतः बुडत आहे आणि सहकारी मित्र पक्षांनीही बुडवत आहे.
संभल हिंसाचारावर रवी किशन म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वेक्षणासाठी गेलेल्या टीमवर दगडफेक करणे चुकीचे आहे. तिथे स्थानिक नेते जे करत आहेत ते योग्य नाही. लहान मुले आणि तरुणांना आगीत ढकलू नका. हे लोक भडकाऊ विधाने करून तरुणांना पुढे करतात आणि स्वतः एसी रूममध्ये बसतात. मी मुस्लिम समाजाला आवाहन करेन की, मुस्लिम नेत्यांच्या बोलण्याने प्रभावित होऊ नका. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे.
महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? यावर रवी किशन म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फार पूर्वीच घोषणा केली होती की, तिन्ही पक्षांचे नेते बसून यावर निर्णय घेतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App