वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोविडची चाचणी घरच्या घरी सोप्या पद्धतीने करता यावी यासाठी कोविड होम टेस्टिंग कीट येत्या ४ – ५ दिवसांमध्ये बाजारात उपलब्ध होईल, home testing kit will be available in the market in next 4-5 days; Important information of ICMR, simple method of testing
अशी महत्त्वपूर्ण माहिती इंडियन कांउन्सिल फॉम मेडिकल रिचर्सचे (ICMR) महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या दैनंदिन पत्रकार परिषदेत डॉ. भार्गव यांनी कोविड चाचण्यांबाबत धोरणाची माहिती दिली. ते म्हणाले, की चाचण्या वाढविण्यावर केंद्र सरकारचा भर आहे. कारण त्यातून होम आयसोलेशनपासून अन्य वैद्यकीय व्यवस्था मार्गी लावता येतात.
नागरिकांसाठी घरच्या घरी कोविड चाचण्या करण्याची पद्धत देखील सोपी आहे. ती ४ टप्प्यांमध्ये विभागली आहे. १. कोविड होम टेस्टिंग कीट विकत घेणे २. मोबाईल ऍप डाऊनलोड करणे ३. त्याच्यावर रजिट्रेशन करून घरच्या घरी चाचणी करणे
Step 1 is that you buy the test kit from a chemist; Step 2- download mobile app; Step 3- conduct the test at home; step 4- click mobile image and upload, test result will be given. Within 3-4 days this should be available in the market: Dr Balram Bhargava, ICMR — ANI (@ANI) May 20, 2021
Step 1 is that you buy the test kit from a chemist; Step 2- download mobile app; Step 3- conduct the test at home; step 4- click mobile image and upload, test result will be given. Within 3-4 days this should be available in the market: Dr Balram Bhargava, ICMR
— ANI (@ANI) May 20, 2021
४. मोबाईलवर त्याची इमेज अपलोड करणे. यानंतर मोबाईलवरच रिझल्ट मिळेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर पेशंटचा डाटा सुरक्षित आणि गोपनीय असेल. तो आयसीएमआरच्या डाटाबेसशी कनेक्टेड राहील.
संबंधित कोविड होम टेस्टिंग कीट येत्या ४ – ५ दिवसांमध्ये बाजारात उपलब्ध होईल, अशी माहिती त्यांनी दिली. या कीटसाठी एका कंपनीने सरकारकडे आधीच अर्ज करून ठेवला आहे. आणखी तीन कंपन्यांनी देखील तयारी दाखविली आहे. पुढच्या आठवड्यात यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण होईल.
जास्तीत जास्त रॅपिड अँटिजंट टेस्ट व्हाव्यात करण त्यांचा रिझल्ट लवकर मिळतो. या महिनाअखेरपर्यंत आम्ही २५ लाख चाचण्यांचे टार्गेट ठेवले आहे. आणि जून महिनाअखेरपर्यंत ४५ लाथ चाचण्यांचे टार्गेट ठेवले आहे, अशी माहिती डॉ. बलराम भार्गव यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App