वृत्तसंस्था
विजयपाडा : कर्नाटकमधील निवृत्त न्यायाधीश वसंत मूलसावळगी न्यायमूर्तींनी हिंदूंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. मुस्लिमांनी जर खरा विरोध केला असता, तर मुघल काळात भारतात एकही हिंदू जिवंत शिल्लक राहिला नसता, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. विजयवाडा शहरात राज्यघटनेची तत्त्वे उद्दिष्टे पूर्ण झाली का?, या विषयावरच्या परिसंवादात वसंत मूलसावळगी बोलत होते. राष्ट्रीय सौहार्द वेदिके आणि अन्य संस्थांनी हा परिसंवाद आयोजित केला होता. Hindus survive in India at the mercy of Mughals; Rama, Krishna are fictional characters in the novel
जर मुघलांच्या राजवटीत मुस्लिमांनी हिंदूंना विरोध केला असता तर भारतात एकही हिंदू जिवंत शिल्लक राहिला नसता. त्यांनी सर्व हिंदूंना मारले असते. मुघलांनी शेकडो वर्षे राज्य केले, तरीही मुस्लिम अल्पसंख्याक का आहेत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. वसंत मूलसावळगी यांनी हिंदू देवी – देवतांच्या अस्तित्वावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, हिंदू देवी-देवता, भगवान राम, भगवान कृष्ण ही कादंबरीतील काल्पनिक पात्रे आहेत. या ऐतिहासिक व्यक्तिरेखा नाहीत. सम्राट अशोक ही एक ऐतिहासिक व्यक्तिरेखा होती. उत्तराखंडमधील शिवलिंगावर बुद्धाचे चित्र आहे. या प्रकरणी बौद्ध अनुयायांनी याचिका दाखल केली आहे. मंदिरांचे मशिदीत रूपांतर झाल्याचे सांगण्यात आले. पण मंदिर बांधण्यापूर्वी सम्राट अशोकाने 84 हजार बौद्ध मठ बांधले होते. ते सर्व कुठे गेले? हे सर्व काळाबरोबर घडते. याला मोठा मुद्दा बनवायचा का?, असा सवालही त्यांनी केला.
मुसलमानांनी हिंदूंची मंदिरे पाडली त्यांचे धर्मांतर केले, असा दावा करणाऱ्यांनी भारतातील मुस्लिमांचा 700 वर्षांचा इतिहास जाणून घ्यावा. मुघल राजा अकबराची पत्नी हिंदू राहिली आणि त्याने तिचे धर्मांतर केले नाही. अकबराने आपल्या आवारात कृष्णाचे मंदिर बांधले, असा दावाही ते म्हणाले.
वसंत मूलसावळगी यांच्या या वक्तव्यांचे कर्नाटक बरोबर अन्य राज्यातही पडसाद उमटले असून अनेकांनी सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App