नवी दिल्ली : कोरोनावरील उपचारासाठी पतंजलीकडून तयार करण्यात आलेले कोरोनिल या औषधाबाबत खोटी माहिती दिल्याने रामदेव वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.रामदेव यांनी चिथावणीखोर विधाने करू नयेत, अशी तोंडी सूचना न्यायालयाने त्यांना केली आहे.High court issued summons against Ramdev Baba
तसेच ॲलोपॅथी उपचारांवर सातत्याने टीका करणाऱ्या योगगुरू रामदेवबाबा यांना दिल्ली उच्च न्यायालयाने समन्स बजावतानाच म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.
दिल्ली मेडिकल असोसिएशनने (डीएमए) रामदेव यांच्याविरोधात खटला दाखल केला होता, त्यावर आज सुनावणी घेताना उच्च न्यायालयाने त्यांना समन्स बजावले आहेत.
कोरोनिल या औषधाच्या वापराने कोरोना बरा होतो, असा दावा रामदेवबाबांनी केला होता. डॉक्टरांच्या संघटनेने त्यांच्या या दाव्याला आक्षेप घेतला होता. रामदेवबाबांच्या या विधानामुळे डॉक्टरांच्या संघटनेचे कसे काय नुकसान होते?
अशी विचारणा न्यायालयाने केली असता डीमएमचे बाजू मांडणारे राजीव दत्ता म्हणाले की,‘‘ रामदेवबाबांच्या त्या कथित औषधामुळे कोरोना बरा होत नाही हे सत्य असून डॉक्टरांच्या नागरी हक्कांच्या संरक्षणासाठी हा खटला दाखल करण्यात आला आहे.’’
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App