तिरुअनंतपुरम : केरळमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या तरी निवडणुकीचे कवित्व अद्याप संपलेले नाही. आता डाव्या पक्षांविरोधात प्रथमच जोरदार दंड थोपटलेल्या भाजपला घेरण्याचा प्रयत्न राज्य सरकारने सुरु केला आहे.Kerala govt. begins enqiry against BJP leaders
केरळ विधानसभा निवडणुकीत भाजपने पैसे वाटल्याचा आरोप होत असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांची चौकशी विशेष पथकाद्वारे करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात पोलिस त्यांची चौकशी करण्याची शक्यता आहे.
याप्रकरणात भाजपच्या आणखी काही नेत्यांचीही चौकशी होणार असल्याचे समजते. निवडणूक काळात आदिवासी नेते सी. के. जानू यांच्या पक्षाने राष्ट्रीय लेकशाही आघाडीला साथ द्यावी,
यासाठी त्यांना पैसे पुरविल्याचा आरोप सुरेंद्रन यांनी फेटाळला. जानू यांनी पैशाचे आमिष दाखविले नाही किंवा रक्कमही दिलेली नाही, असा दावा त्यांनी केला.
पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासाठी असे आरोप होत असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी भाजप पोलिसांना पूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App