झारखंड प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी झामुमो सरकारला धारेवर धरले.
विशेष प्रतिनिधी
रांची : झारखंड भाजपचे निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान ( Shivraj Singh Chauhan) यांनी गुरुवारी राजधानी रांचीमधून सत्ताधारी हेमंत सोरेन सरकारवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, भाजपच्या जनक्षोभ रॅलीला सोरेन सरकार घाबरले आहे.
रांची येथील मोराबादी मैदानावर भारतीय युवा मोर्चाच्या नेतृत्वाखाली युवा जन आक्रोश रॅलीसाठी शिवराज सिंह चौहान गुरुवारी सायंकाळी उशिरा राजधानीत पोहोचले. प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी झामुमो सरकारला धारेवर धरले.
शिवराज सिंह म्हणाले, भाजपच्या जनक्षोभ रॅलीला सोरेन सरकार घाबरले आहे. भाजप कार्यकर्त्यांना ठिकठिकाणी रोखले जात आहे. ही अन्यायाची पराकाष्ठा आहे, अत्याचाराची पराकाष्ठा आहे. घाबरलेला मुख्यमंत्रीच हे करू शकतो. झारखंड किंवा पक्ष हेमंत सोरेन यांच्या ताब्यात नाही.
शिवराज म्हणाले की, भाजप कार्यकर्ते सोरेन सरकारच्या कोल्हे कुईला घाबरत नाहीत. आम्ही व आमचे कार्यकर्ते अन्यायाविरुद्ध लढा देऊ. झारखंडच्या जनतेला अहिंसक पद्धतीने न्याय मिळवून देत राहू. हेमंत सोरेन सरकार आंदोलन चिरडून टाकू शकत नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App