वृत्तसंस्था
केवडिया (गुजरात) : स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर “आरोग्य” हा विषय खऱ्या अर्थाने राष्ट्रीय राजकीय अजेंड्यावर आला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय इम्युनायझेशन प्रोग्रॅमचे प्रमुख डॉ. एन. के. अरोरा यांनी केले आहे. गुजरात मधील केवढा केवडिया येथे राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या बैठकीत ते बोलत होते. Health on national political agenda after 75 years of independence
डॉ. अरोरा म्हणाले, की कोरोनाने देशाला खऱ्या अर्थाने हे शिकवले की आरोग्य आणि संपत्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्षांमध्ये हे पहिल्यांदा घडले आहे, की देशामध्ये “आरोग्य” या विषया सर्वाधिक महत्त्व दिले गेले आहे.
किंबहुना आरोग्य या विषयाकडे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय या तीनही दृष्टिकोनातून महत्त्व दिले गेले आहे. याआधी देशाचे प्राधान्यक्रम वेगवेगळे ठरवले गेले होते. होते. ते संबंधित काळानुसार योग्य होते. परंतु, आता आरोग्याला प्राधान्य दिल्याने देशाच्या एकूण कल्याण प्रक्रियेत मोठे बदल होतील, असे भाकीतही डॉ. अरोरा यांनी वर्तविले आहे.
देशाच्या प्रमुख राजकीय अजेंड्यावर आरोग्य हा विषय आल्याने जनजागृती तर वाढली आहेच पण त्याचे विविध पैलूही समोर आले आहेत. देशाचे प्रशिक्षित मनुष्यबळ वाढविण्यासाठी त्याचा उपयोग होतो आहे. याचा सकारात्मक आणि दीर्घकालीन परिमाण देशावर होईल, असा विश्वास देखील डॉ. अरोरा यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App