Corona Vaccination: कोरोनासोबतच्या युद्धात भारताने गाठला आणखी एक टप्पा, ७५ टक्के प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण, पीएम मोदींनी केले अभिनंदन


देशात कोरोनाची लढाई सुरूच आहे. हा लढा अधिक बळकट करण्यासाठी लसीकरण मोहीम जोरात राबविण्यात येत आहे. माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, भारतातील ७५ टक्के प्रौढ लोकसंख्येला लसीकरणाचे दोन्ही डोस मिळाले आहेत. Corona Vaccination India reaches another milestone in Corona Vaccination, 75% of adult population vaccinated, PM Modi congratulates


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात कोरोनाची लढाई सुरूच आहे. हा लढा अधिक बळकट करण्यासाठी लसीकरण मोहीम जोरात राबविण्यात येत आहे. माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, भारतातील ७५ टक्के प्रौढ लोकसंख्येला लसीकरणाचे दोन्ही डोस मिळाले आहेत.

मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीवर आनंद व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून जनतेचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, 75 टक्के प्रौढ लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल सर्व देशवासीयांचे अभिनंदन. ते पुढे म्हणाले की, आमची लसीकरण मोहीम यशस्वी करणाऱ्या सर्वांचा अभिमान आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारत अधिक बळकट – आरोग्यमंत्री

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशातील एकूण लसीकरणांची संख्या 1,65,70,60,692 वर पोहोचली आहे. त्यावर आनंद व्यक्त करताना आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी ट्विट केले की, “‘सबका साथ, सबका प्रयास’ या मंत्राने, भारताने आपल्या ७५% प्रौढ लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस मिळण्याचे लक्ष्य गाठले आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण अधिक बळकट होत आहोत. आपण सर्व नियमांचे पालन केले पाहिजे आणि लवकरात लवकर लस घ्यावी.

गेल्या 24 तासांत 893 जणांचा मृत्यू

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 2 लाख 34 हजार 281 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 893 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 352784 लोक बरे झाले आहेत. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 18,84,937 झाली आहे.

Corona Vaccination India reaches another milestone in Corona Vaccination, 75% of adult population vaccinated, PM Modi congratulates

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात