Noah violence : नूह हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत पोलिसांकडून ४१ एफआयआर दाखल, ११६ जणांना अटक


हिंसाचारात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून १०००पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

विशेष प्रतनिधी

हरियाणा  : हरियाणातील नूह मेवात येथे विश्व हिंदू परिषदेच्या ब्रजमंडल यात्रेदरम्यान झालेल्या हिंसाचार आणि दंगलीनंतर बुधवारी सलग तिसऱ्या दिवशीही तणाव कायम आहे. सोमवारी दंगल उसळल्यानंतर अजूनही परिस्थिती सामान्य झालेली नाही. जवळच्या जिल्ह्यांमध्ये हिंसक घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दुसरीकडे, नूह, गुरुग्राम, पलवल जिल्ह्यात तणावाची स्थिती कायम आहे. Haryana So far 41 FIRs have been filed by the police in connection with Noah violence 116 people have been arrested

नूह हिंसाचारावर हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी सांगितले आहे की, ‘नूहमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. सुमारे 41 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. आतापर्यंत 116 जणांना अटक करण्यात आली आहे. ज्या पद्धतीने दगड, शस्त्रे, गोळ्या सापडल्या आहेत, त्यावरून यामागे कोणीतरी सूत्रधार असल्याचे दिसते. आम्ही सखोल चौकशी करू आणि संबंधितांवर कठोर कारवाई करू.

मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गुरुग्राम आणि पलवलमध्ये अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. यासोबतच मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, रेवाडी जिल्ह्यातील धवना येथे एका समुदायाच्या झोपड्या जाळण्यात आल्या. त्याचवेळी बावळ गावात काही हुल्लडबाजांनी तोडफोड आणि मारामारीच्या घटना घडल्या आहेत.

या हिंसाचाराच्या वाढत्या घटना पाहता हरियाणा सरकारने आजही येथे संचारबंदी सुरू ठेवली असून राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. ज्यामध्ये नूह, गुरुग्राम, पलवल, झज्जर, फरीदाबाद, रेवाडी, सोनीपत, पानिपत आणि महेंद्रगडचा समावेश आहे. यासह बुधवारपर्यंत चार जिल्ह्यांतील काही हिंसाचारग्रस्त भागात इंटरनेट आणि एसएमएस सेवाही बंद करण्यात आली आहे. या भागांमध्ये नूह, गुरुग्राम, पलवल आणि फरिदाबाद या भागांची नावे देण्यात आली आहेत.

मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काय सांगितले? –

हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर नूहसह या सर्व भागात निमलष्करी दलाच्या 15 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. सुरक्षा दलांनी आज सकाळी अनेक संवेदनशील ठिकाणी फ्लॅग मार्चही काढला आहे. या हिंसक घटनेबाबत हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर म्हणाले की, आतापर्यंत हिंसाचाराशी संबंधित 44 एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. ज्यामध्ये 116 जणांची नावे असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 6 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हिंसाचाराची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ज्यामध्ये 800 कर्मचारी कामाला लागले आहेत. यासोबतच हिंसाचारामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज प्रशासनाकडून घेतला जात आहे. गैरप्रकार करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. सर्वांना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहनही केले आहे.

Haryana So far 41 FIRs have been filed by the police in connection with Noah violence 116 people have been arrested

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात