सरकारचे जुलैमध्ये 1.65 लाख कोटी जीएसटी कलेक्शन; गतवर्षीच्या तुलनेत 11% जास्त, जूनमध्ये 1.61 कोटींचे संकलन


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सरकारने जुलै 2023 मध्ये वस्तू आणि सेवा कर (GST) मधून 1,65,105 कोटी रुपये जमा केले आहेत. वार्षिक आधारावर 11% वाढ झाली आहे. जुलै 2022 मध्ये ते 1,48,995 कोटी रुपये होते. जुलैमध्ये सलग पाचव्यांदा महसूल संकलन 1.6 लाख कोटींच्या वर गेले आहे.1.65 lakh crore GST collection by government in July; 1.61 crore collection in June, up 11% from last year

यापूर्वी जूनमध्ये ते 1,61,497 कोटी रुपये होते. तथापि, आत्तापर्यंत सर्वोच्च जीएसटी संकलन एप्रिल 2023 मध्ये होते, जेव्हा हा आकडा 1.87 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला होता. याशिवाय, सलग 17 महिन्यांपासून देशाचे जीएसटी संकलन 1.4 लाख कोटी रुपयांच्या वर राहिले आहे.जीएसटी कलेक्शनमध्ये महाराष्ट्र टॉप

जुलै 2023 मध्ये जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र टॉप-5 राज्यांमध्ये अव्वल आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात जीएसटी संकलन 18% ने वाढून 26,064 कोटी रुपये झाले आहे. या यादीत 11,505 कोटींच्या कलेक्शनसह कर्नाटक दुसऱ्या तर तामिळनाडू 1,0022 कोटींच्या कलेक्शनसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

2017 मध्ये GST लागू करण्यात आला

जीएसटी हा अप्रत्यक्ष कर आहे. मागील अप्रत्यक्ष कर (VAT), सेवा कर, खरेदी कर, उत्पादन शुल्क आणि इतर अनेक अप्रत्यक्ष करांच्या विविधतेच्या जागी 2017 मध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात आली. जीएसटीचे 5, 12, 18 आणि 28% असे चार स्लॅब आहेत.

1.65 lakh crore GST collection by government in July; 1.61 crore collection in June, up 11% from last year

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात