भिडे गुरूजींवर कारवाई करूच, पण सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या शिदोरी मासिकावरही कारवाई करू!!


देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत रोखठोक भूमिका

प्रतिनिधी

मुंबई : महात्मा गांधींवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे गुरूजींवर कारवाई करूच, पण स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या शिदोरी मासिकावरही कारवाई करू, अशी रोखठोक भूमिका उपमुख्यमंत्री – गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत मांडली. त्यावर चिडलेल्या काँग्रेस आमदारांनी सदनात मोठा गदारोळ करून सभात्याग केला. We will also take action against Shidori magazine of Congress which insults Savarkar

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेस सह विरोधकांनी बुधवारी विधानसभेत जोरदार गदारोळ केला. या मुद्द्यावरुन विरोधकांनी सभागृहात चर्चेची मागणी केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ती मागणी फेटाळून लावली. परंतु, यावेळी निवेदन देण्यासाठी उभ्या राहिलेल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्यावरुन काँग्रेस सदस्यांनी गदारोळ केला.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या निवेदनात संभाजी भिडे यांच्या नावापुढे ‘गुरुजी’ अशी उपाधी लावली. यावर काँग्रेसच्या आमदारांनी तीव्र आक्षेप नोंदवला. मात्र, देवेंद्र फडणवीस हे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. संभाजी भिडे हे आम्हाला गुरुजी वाटतात. त्यामध्ये काय अडचण आहे? त्यांचं नावच भिडे गुरुजी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हणताच सभागृहात आणखीनच गोंधळ उडाला.

या सगळ्या गोंधळात देवेंद्र फडणवीस यांनी आपले निवेदन तसेच पुढे सुरु ठेवले. कुठल्याही राष्ट्रीय नेत्याच्या संदर्भात कोणीही अपमानजक वक्तव्य केले असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल, पोलीस कारवाई करतील. हे प्रकरण अमरावती पोलीसांकडे तपासासाठी वर्ग केले आहे. संभाजी भिडे गुरुजी हे हिंदुत्त्वासाठी काम करतात. ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या किल्ल्यांशी बहुजनांना जोडतात. हे चांगले कार्य आहे. पण तरीही त्यांना महापुरुषांबाबत, असे वक्तव्य करण्याचा अधिकार कोणीही दिलेला नाही. कोणालाही असा अधिकार दिलेला नाही. कोणीही महापुरुषांबाबत अवमानजक वक्तव्य केले, तर त्यांच्यावर कारवाई होईल.

सावरकरांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई

पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतही आक्षेपार्ह लिखाण केले जात आहे. काँग्रेसच्या ‘शिदोरी’ या मुखपत्रातून वीर सावरकर यांना माफीवीर म्हटले जाते. सावरकर समलैंगिक होते, वीर सावरकर स्वातंत्र्यलढ्यात सहभागी नव्हते, असे या मुखपत्रात म्हटले आहे. ज्याप्रमाणे संभाजी भिडे गुरुजी यांच्या वक्तव्यावर कारवाई करण्यात येईल, त्याचप्रमाणे वीर सावरकरांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शिदोरी मुखपत्रावरही कारवाई केली जाईल, गुन्हा दाखल करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पृथ्वीराज चव्हाणांचा आक्षेप

देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केल्यानंतर मला फोन आणि ई-मेलवरुन धमक्या आल्या. धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली, तो जामिनावर सुटला. आमच्या अनेक नेत्यांना धमक्या देण्यात आल्या आहेत. पण या लोकांना धमकी देण्यासाठी कोणीतरी प्रवृत्त करत आहे, यामागील सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेतला पाहिजे.

संभाजी भिडे फ्रॉड माणूस आहे, याची डिग्री काय आहे, त्याने कुठे शिक्षण घेतलंय, हा प्राध्यापक कुठे होता? सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, हा माणूस सोनं गोळा करत आहे. आपल्या कायद्याप्रमाणे कुठल्याही संस्थेला वर्गणी गोळा करायची असेल तर त्या संस्थेला जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी लागते. मात्र, हा माणूस कितीतरी टनाने सोनं गोळा करत आहे, तरुणांची दिशाभूल करत आहे. ऐन परीक्षेच्यावेळी गडकिल्ल्यांची मोहीम काढतो. बहुजन समाजाची मुलं कुठेतरी फरफटत जावीत, हा त्याचा उद्देश आहे, असा हल्लाबोल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

We will also take action against Shidori magazine of Congress which insults Savarkar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात