I.N.D.I.A.सोबतच्या युतीच्या प्रश्नावर ‘KCR’ यांनी लगावला टोला, म्हणाले ‘’त्यांनी ५० वर्षे देशावर…’’


भारतीय राष्ट्र समितीचे राज्यसभेत एकूण ७ खासदार आहेत.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएने दमदार कामगिरी केली आहे. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांची प्रत्येक युक्ती पंतप्रधान मोदींना पराभूत करण्यात अपयशी ठरली आहे. पण आता देशातील 21 विरोधी पक्षांनी ‘ I.N.D.I.A.’ नावाची महाआघाडी निर्माण केली आहे. तर, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी विरोधकांच्या या महाआघाडीची खिल्ली उडवली आहे.  On the issue of alliance with I N D I A KCR took a dig said He ruled the country for 50 years

केसीआर म्हणाले, ‘’ I.N.D.I.A.मधील  पक्षांनी ५० वर्षे देशावर राज्य केले, तेव्हा मग त्यांनी काय केले?’’ मंगळवारी महाराष्ट्रातील वाटेगाव येथे अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त आयोजित सभेला मुख्यमंत्री केसीआर बोलत होते. यावेळी ते म्हणाले की भारतीय राष्ट्र समिती (BRS) भाजपाच्या नेतृत्वाखालील NDA सोबत नाही किंवा ‘ I.N.D.I.A.आघाडीसोबतही नाही. मात्र आपल्याला अनेक पक्षांचा पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

केसीआर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. याशिवाय महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने अण्णाभाऊ साठे यांच्या बलिदानाला मान्यता द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

देशात बदल घडवून आणण्यासाठी माध्यमांनी आपली भूमिका बजावावी, असे आवाहनही त्यांनी केले. अशा परिस्थितीत केसीआर कोणाला पाठिंबा देणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बीआरएसचे राज्यसभेत एकूण ७ खासदार आहेत. अशा परिस्थितीत ते ज्या आघाडीला पाठिंबा देतील, ती आघाडी राज्यसभेत विधेयक मंजूर करण्यात वरचढ ठरेल.

On the issue of alliance with I N D I A KCR took a dig said He ruled the country for 50

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात