विरोधी आघाडीमध्ये सनातन विरोधात बोलण्याची स्पर्धाच लागली आहे, असंही विज यांनी म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी
हरियाणा : अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत उद्धव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यानंतर आता त्यांच्यावर भाजपा नेत्यांकडून तसेच सत्ताधाऱ्यांकडून जोरदार टीका होत आहे.. हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी उद्धव ठाकरेंसह संपूर्ण I-N-D-I-A आघाडीवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, सनातनच्या विरोधात बोलण्याची विरोधकांमध्ये स्पर्धाच लागली आहे. Haryana Home Minister Anil Vij strongly criticized Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला विरोध करत अनिल विज यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा हवाला दिला. विज म्हणाले – त्यांच्या वडिलांनी दावा केला होता की ‘राममंदिराच्या जागी जो ढांचा होता तो शिवसैनिकांनी पाडला होता, पण आता I-N-D-I-A आघाडीचे सदस्य बनून यांच्यात सनातन विरोधात बोलण्याची आणि जास्तीत जास्त भारतीयांचा अपमान करण्याची स्पर्धा लागली आहे. मात्र निवडणुकीत हे सर्वजण तोंडावर आपटणार आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या उद्घाटनबाबत बोलताना वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते- येत्या काही दिवसांत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनासाठी देशभरातून अनेक हिंदूंना बोलावले जाण्याची शक्यता आहे आणि समारंभ संपल्यानंतर लोक परतताना गोध्रा घटनेसारखे काहीतरी करू घडू शकते.
याशिवाय तामिळनाडूचे राज्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी काही दिवस अगोदर सनातन धर्माबाबत वादग्रस्त टिप्पणी केली होती. त्यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांशी केली. यानंतर द्रमुक नेते ए राजा यांनी सनातन धर्माची तुलना एड्सशी केली. या दोघांनंतर आता द्रमुकचे शिक्षणमंत्री पोनमुडी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते म्हणतात की सनातन धर्माशी लढण्यासाठीच I.N.D.I.A आघाडीची निर्मिती झाली आहे. ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App