प्रतिनिधी
जळगाव : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलनादरम्यान जो लाठीमार झाला, त्याच्याशी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बिलकुल संबंध नव्हता. तिथे पोलिसांची चूक होती, तरी देखील फडणवीस यांनी पुढे येऊन माफी मागितली. तशी गरज नव्हती, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे केले. Fadnavis apologised, though not related to Lathimara
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा – भडगाव तालुक्यात आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांचे जोरदार समर्थन केले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, की मराठा आंदोलनात अंतरवली सराटीत पोलीस अधिकाऱ्यांनी निर्णय घेऊन लाठीमार केला होता. त्यामध्ये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काहीही संबंध नव्हता. मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यापैकी कोणीही लाठीमाराचे आदेश दिलेले नव्हते. तरी देखील पुढे येऊन देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली. वास्तविक त्याची गरज नव्हती, तरी देखील त्यांनी माफी मागितली.
अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणास च्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांनी उपोषण सोडण्यासाठी शिंदे – फडणवीस सरकारला पाच आटी घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अजित दादांचे फडणवीस यांच्या माफीच्या मुद्द्यावर महत्त्वाचे वक्तव्य पुढे आले आहे.
14 कार्यक्रमांमध्ये एक कोटी 61 लाख लाभार्थ्यांना लाभ
आमदार किशोर अप्पा पाटील यांच्या मतदारसंघातील ५३२ कोटी रुपयांच्या विकासकामांचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. शासन आपल्या दारी या शासनाच्या महत्वाकांक्षी अभियानातून आतापर्यंत १४ कार्यक्रम पार पडले असून त्यातून १ कोटी ६१ लाख लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
राज्य शासनाला केंद्र शासनाचे नेहमीच पाठबळ असते. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना दहा हजार कोटी रुपयांची करमाफी देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असल्याचे सांगितले.
शासनाने एक रुपयात पीक विमा ही योजना आणली, एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत दिली. कमी पाऊस पडल्याने शेतकरी अडचणीत सापडला असला तरीही सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट केले.
राज्यातील महायुती सरकारने शासनाने ३५ जल सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून त्यातून ८ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
राज्यातील विरोधी पक्ष सत्ता गेल्यामुळे संतुलन बिघडल्याप्रमाणे वागत असून त्यातूनच ते या उपक्रमावर टीका करत असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. तसेच कितीही टीका केली तरी शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरुच राहील असे यावेळी बोलताना स्पष्ट केले. तर पुढील उपक्रम हा महिलांना सक्षम करण्यासाठी तसेच त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी राबवणार असल्याचे यावेळी बोलताना स्पष्ट केले.
याप्रसंगी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, खासदार उन्मेश पाटील, आमदार किशोर अप्पा पाटील, आमदार चिमणआबा पाटील, आमदार सौ. लता सोनवणे, आमदार सुरेश जाधव, आमदार महेश चव्हाण, आमदार राजकुमार रावल, आमदार संजय सावकारे तसेच सर्व लोकप्रतिनिधी, सरपंच, तालुक्यातील हजारो लाभार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App