विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Haryana हरियाणा विधानसभा निवडणुकीत हो नाही करता करता काँग्रेस आणि आम आदमी पार्टीची युती झालीच नाही. काँग्रेसला आता एकट्यानेच विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या हातातून येणारे बहुमत निसटते की काय, याची चिंता काँग्रेस नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे. Haryana
या पार्श्वभूमीवर ऐन निवडणुकीमध्ये काँग्रेस अंतर्गत कुठला दगाफटका होऊ नये यासाठी काँग्रेस श्रेष्ठींनी तीन वरिष्ठ नेत्यांकडे हरियाणाच्या निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवली आहे. यामध्ये प्रमुख जबाबदारी राजस्थान गमावलेल्या अशोक गहलोत यांच्यावर आहे. त्यांच्याबरोबरच प्रताप सिंह बाजवा आणि अजय माकन या दोन नेत्यांना काँग्रेसने निरीक्षक नेमले आहे. हरियाणातील काँग्रेसचे सगळे उमेदवार, त्यांच्या प्रचार कार्यक्रमांची आखणी आणि नियोजन, तसेच प्रचार कार्यक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी यावर हे तीन निरीक्षक लक्ष ठेवणार आहेत. Haryana
China : चीनने निवृत्तीचे वय वाढवले, घटत्या लोकसंख्येमुळे निर्णय; पुरुष 63 व महिला 58 वर्षांपर्यंत काम करणार
राजस्थान विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने लढविल्या होत्या. परंतु, भाजपने काँग्रेसवर मात करून तिथली सत्ता हस्तगत केली. अशोक गेहलोत यांना राजस्थान गमवावा लागला. त्यानंतर त्यांच्याकडे काँग्रेस पक्षाने फारसे कुठले महत्त्वाचे काम सोपविले नव्हते. हरियाणा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्यावर निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवून अशोक गेहलोत त्यांना काँग्रेसने आपल्या मुख्य प्रवाहात पुन्हा आणले आहे.
राजस्थान काँग्रेसला का गमवावे लागले??, त्याची नेमकी कारणे काय??, याचा अशोक गेहलोत यांनी केलेला अभ्यास त्यांना हरियाणा निवडणुकीत काँग्रेससाठी उपयोगी ठरू शकतो, असा काँग्रेस श्रेष्ठींचा होरा आहे. त्यांच्याबरोबर नेमलेले प्रताप सिंह बाजवा हे काँग्रेसचे पंजाब मधले नेते आहेत. पंजाब मध्ये आम आदमी पार्टीने काँग्रेसचा पराभव केला होता. त्यांचाही निवडणुकीचा अभ्यास मोठा आहे. त्याचा उपयोग काँग्रेस हरियाणा करून घेत आहे. अजय माकन हे दिल्ली काँग्रेसचे नेते आहेत. दिल्लीत आम आदमी पार्टीची सत्ता आहे तिच्या विरोधात अजय माकन आक्रमकपणे काँग्रेसचा लढा चालू ठेवत आहेत. त्यांच्या आक्रमकतेचा फायदा घेण्याचा काँग्रेसचा इरादा आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य असे की, हरियाणात सलग दोन टर्म भाजपची सत्ता आहे. काँग्रेसची रणनीती आगामी बहुमत हातातून निसटू नये मध्येच दगाफटका होऊ नयेत यासाठी आम आदमी पार्टीशी टक्कर घेणाऱ्या नेत्यांना काँग्रेस श्रेष्ठींनी हरियाणात पक्षाचे निरीक्षक नेमले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App