आर्यन खान अटकेवर हंसल मेहता यांचं विवादास्पद विधान,’गांजाचे सेवन अनेक देशांमध्ये कायदेशीर’

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आर्यन खान याला ड्रग केसमध्ये अटक झाल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी शाहरूखच्या कुटुंबियांना दिलासा दिला आहे. काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विटरवरून आर्यनला पाठिंबा दिला. त्यांनी थेट एनसीबीच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उठविले. फिल्ममेकर हंसल मेहता यांनीसुद्धा याबाबतीत एक विवादास्पद ट्विट केले आहे.

Hansal Mehta statement on Aryan Khan’s arrest, consumption of marijuana is legal in many countries

भांग आणि गांजा सेवन हे अनेक देशांमध्ये कायदेशीर असून हा गुन्हा समजला जात नाही असे विधान त्यांनी ट्विटरवर केले आहे. छळ करण्यासाठी याचा वापर आपल्या देशात जास्त केला जातो असे त्यांनी म्हटले आहे. हा खोडसाळपणा थांबविण्यासाठी ३७७ कलम हटवण्यात जे आंदोलन केले गेले, अशा प्रकारचे आंदोलन करण्याची गरज आहे असं ते म्हणाले.


Aaryan Khan Drugs Case : आर्यन खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ; जामिनासाठी अर्ज करण्याचे कोर्टाचे आदेश


तनिषा मुखर्जी, स्वरा भास्कर यांनी आर्यनची अटक छळ असल्याचे म्हंटले आहे. सोशल मीडियावर काही सेलिब्रिटीकडून आर्यनला पाठिंबा देण्यात येत आहे. करण जोहर आणि सलमान खान यांनी सुद्धा शाहरुख आणि गौरी यांची भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे. १४ ऑक्टोबरला झालेल्या सुनावणीत आर्यनला जामीन मिळाला नाही. २० ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार असून आर्यनला तोपर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे.

मादक पदाथांचे सेवन हा मुद्दा जर समूळ नष्ट करायचा झाल्यास एंड कन्झुमरला अटक केले जावे का? त्यांचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या लोकांना अटक करून ही साखळी तोडने गरजेचे आहे. आर्यन खानच्या केस मध्ये राजकीय बाजू असल्याचा आरोपही केंद्र सरकारवर होत आहे.

Hansal Mehta statement on Aryan Khan’s arrest, consumption of marijuana is legal in many countries

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub