Yahya Sinwar : हमास चीफ याह्या सिनवार जिवंत असल्याचा दावा, युद्धविरामासाठी कतारशी साधला संपर्क

Yahya Sinwar

वृत्तसंस्था

तेल अवीव : Yahya Sinwar  इस्रायली वेबसाइट द जेरुसलेम पोस्टने सोमवारी दावा केला की हमासचा नेता याह्या सिनवार जिवंत आहे. त्याने कतारशी गुप्तपणे संपर्क साधला आहे. तथापि, एका वरिष्ठ कतारी मुत्सद्द्याने द जेरुसलेम पोस्टला सांगितले की, सिनवारशी थेट संपर्क झाल्याचे वृत्त खोटे आहे. हमासचा वरिष्ठ नेता खलील अल-हय्याह यांच्यामार्फत चर्चा झाली.Yahya Sinwar

खरे तर इस्रायलच्या मिलिटरी इंटेलिजन्सने काही काळापूर्वी सिनवारचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने असेही म्हटले आहे की त्यांनी 21 सप्टेंबर रोजी गाझा येथील एका शाळेवर हल्ला केला होता. हमासचे कमांड सेंटर येथे होते. या हल्ल्यात 22 जणांचा मृत्यू झाला होता. अशा स्थितीत या हवाई हल्ल्यात सिनवारचाही मृत्यू झाल्याची शंका व्यक्त होत आहे.



तेव्हापासून इस्रायली सैन्य गाझावरील हल्ल्यांमध्ये सिनवार मारल्याचा तपास करत होते. गेल्या वर्षी 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर सिनवार फक्त एकदाच दिसला आहे. आयडीएफच्या म्हणण्यानुसार, तो एका बोगद्यातून जात होता. यावेळी तो अनेक इस्रायली ओलिसांसोबत फिरत होता.

सिनवार यांच्या मृत्यूचा पुरावा नाही

इस्रायली मीडिया हारेट्झच्या म्हणण्यानुसार, इस्रायलने अलीकडेच गाझामधील बोगद्यांवर हल्ला केला आहे जिथे सिनवार लपला असल्याचे मानले जात होते. मात्र, आतापर्यंत या हल्ल्यात सिनवारच्या मृत्यूशी संबंधित कोणताही सुगावा लागलेला नाही.

सिनवार अचानक गायब होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकवेळा सिनवार काही काळ गायब झाल्यानंतर युद्धविराम करार किंवा अन्य काही संदेश घेऊन परतले आहेत.

हमासच्या सर्वोच्च नेतृत्वात फक्त सिनवार

गेल्या वर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात तीन महत्त्वाचे व्यक्ती होते. यामध्ये राजनैतिक प्रमुख इस्माइल हनीयेह, लष्करी प्रमुख मोहम्मद दाईफ याशिवाय गाझामधील हमास नेता याह्या सिनवार यांचा समावेश होता. 31 जुलै रोजी इराणमधील हनियाहच्या मृत्यूनंतर, सिनवार हे संस्थेचे नवीन प्रमुख बनले.

दरम्यान, 13 जुलै रोजी झालेल्या हवाई हल्ल्यात हमासचा लष्करी प्रमुख मोहम्मद दाईफ मारला गेला, याची पुष्टी 1 ऑगस्टला झाली. अशा परिस्थितीत हमासच्या सर्वोच्च नेतृत्वात आता फक्त सिनवार उरले आहेत. त्यामुळे यावेळी इस्रायलचे संपूर्ण लक्ष सिनवारला शोधून त्याला मारण्यावर आहे.

Hamas chief Yahya Sinwar claims to be alive, contacts Qatar for ceasefire

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात