Harshvardhan Patil : हर्षवर्धनना पक्षात घ्यायची पवारांची घाई; इंदापूरातल्या पवार निष्ठावंतांचाच उद्रेक होई!!

Harshvardhan Patil

विशेष प्रतिनिधी

पुणे : शरद पवारांनी डाव टाकून मोठी चाणक्य खेळी करून हर्षवर्धन पाटलांना इंदापुरात आपल्या पक्षात घेतले पण त्याचा परिणाम भाजपवर होण्याऐवजी त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसवर झाल्याचे पाहिजे पवारांवर पाळी आली. इंदापुरातल्या पवार निष्ठावंतांचाच उद्रेक राष्ट्रवादीमध्ये झाला. पवारांच्या राष्ट्रवादीतले आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने आणि भरतशेठ शहा तीन नेते पक्षावर भडकले आणि त्यांनी जाहीरपणे पत्रकार परिषद घेऊन उद्रेकाचा इशारा दिला.  Harshawardhan Patil oppose indapur leaders

पवारांच्या राष्ट्रवादीत आजी नको आणि माजी नको हे आम्ही आधीच सांगितले होते. आम्ही गेले कित्येक वर्ष पवारांचे निष्ठावंत म्हणून इंदापूर तालुक्यात वावरतो. त्यांच्या पक्षाचे काम करतो आहोत. आमच्यावर अन्याय करून बाहेरच्या लोकांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली जात असेल, तर ते पक्षाच्या कुठल्याच कार्यकर्ता सहन करणार नाही. येत्या 11 तारखेला मार्केट कमिटीच्या मैदानावर आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहोत. त्या मेळाव्यात उद्रेक झाला तर आमचा नाईलाज आहे, असे या तीन नेत्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर करून टाकले.


Congress : काँग्रेसचे उत्तरेतले पुनरुज्जीवन प्रादेशिक पक्षांच्या मूळावर; महाराष्ट्रातही सत्ता खेचायचा “डाव” ठाकरे + पवारांच्या बळावर!!


पवारांनी हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले त्यानंतर ते फलटणमध्ये मेळावा घेऊन रामराजे निंबाळकर यांना राष्ट्रवादीत घेणार आहेत. आपल्या पुढच्या तारखा बुक असल्याचे पवारांनी जाहीरपणे सांगितले पवारांना इतरांचे पक्ष फोडून आपल्या पक्षात इन्कमिंगची घाई झाली पण त्याचा परिणाम हर्षवर्धन पाटलांच्या इंदापुरातच त्यांच्या पक्षाला भोगावा लागण्याची वेळ आली.

वास्तविक हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने आणि भरतशेठ शहा यांच्याशी बोलल्या होत्या. परंतु, सुप्रिया सुळे यांची शिष्टाई अपयशी ठरली. या तिन्ही नेत्यांनी हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेश कार्यक्रमाकडे पाठ फिरवली पण प्रवेश होताच स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन पवार आणि त्यांच्या पक्षाला उद्रेकाचा इशारा दिला

Harshvardhan Patil oppose indapur leaders

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात