#हलाल मुक्त दिवाळीचा ट्विटर वर ट्रेंड


प्रतिनिधी

मुंबई : दिवाळी ऐन तोंडावर आली असताना हलाल मुक्त दिवाळीचा ट्रेंड ट्विटरवर पाहायला मिळत आहे. #Halal_Free_Diwali या हॅशटॅगसह हलाल उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची ही आहे. उत्पादनांना हलाल प्रमाणपत्र देण्याच्या नावाखाली पैसे उभे केले जातात आणि नंतर ते विशिष्ट धर्माच्या प्रचारासाठी वापरले जातात. प्रसिद्ध फूड चेन आणि डिलिव्हरी अॅप्स या ट्रेंडच्या निशाण्यावर आहेत.
Halal free Diwali trends on Twitter

मुस्लिम धर्मीय हिंदूंवर हलाल अन्न का लादतात? हलाल प्रमाणपत्राविरोधात ट्विटही करण्यात आले आहे. हा वाद नवीन नाही. हिंदू हलाल मांस खात नाहीत. हिंदू ‘झटका’ पद्धतीचे मांस खातात. पण ते सहजासहजी मिळत नाही. त्यामुळे हिंदूंना हलाल पद्धतीचे मांस खावे लागते. अलिकडच्या काळात हलाल उत्पादनांचा उद्योग कोट्यवधी रुपयांचा असल्याचे समोर आले आहे.

हलाल म्हणजे काय?

हलाल ही एक मूल्य प्रणाली आणि जीवनशैली आहे ज्याचे समर्थन इस्लाम धर्म करतो. हलाल म्हणजे ज्यासाठी परवानगी आहे वा जे कायदेशीर आहे. इस्लाममध्ये पाच गोष्टींची सक्ती आहे. ज्यात फर्ज (अनिवार्य), मुस्तहब (शिफारस केलेले), मुबाह (तटस्थ), मकरूह (निंदनीय) आणि हराम (निषिद्ध) यांचा समावेश आहे.

हलाल प्रमाणपत्र म्हणजे काय?

हलाल प्रमाणपत्र मिळवणे म्हणजे संबंधित उत्पादन इस्लामी नियमांनुसार वैध आहे. भारतात अशा पाच-सहा संस्था आहेत ज्या हलाल प्रमाणपत्र देतात. सर्वाधिक मागणी जमियत-उलामा-ए-महाराष्ट्र आणि जमियत-उलामा-ए-हिंद हलाल ट्रस्टकडून आहे. कंपनीने सादर केलेले अहवाल आणि कागदपत्रे पाहून हलाल प्रमाणपत्र जारी करायचे की नाही याचा निर्णय शरिया समित्या घेतात. उत्पादनाची वैज्ञानिक किंवा विश्लेषणात्मक चाचणी यात केली जात नाही. या संपूर्ण प्रक्रियेत सरकार सहभागी नाही.

कधीपासून हे प्रमाणपत्र लागू झाले? 

तुम्हाला हे जाणून आश्चर्य  वाटेल की 1974 पूर्वी कोणत्याही उत्पादनाला हलाल प्रमाणपत्र नव्हते. 1974 मध्ये प्रथमच मांसासाठी हलाल प्रमाणपत्र सादर करण्यात आले. 1993 पर्यंत, फक्त मांस हलाल प्रमाणित होते. पॅकेज केलेल्या उत्पादनांच्या लोकप्रियतेसह, हलाल प्रमाणपत्राच्या आकडेवारीतही वाढ झाली. आता त्याचे रूपांतर अब्जावधी डॉलर्सच्या उद्योगात झाले आहे. जागतिक हलाल दिन दरवर्षी १ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. युनायटेड वर्ल्ड हलाल डेव्हलपमेंट (UNWHD) नावाची एक संस्था आहे जी हलाल उत्पादनांबद्दल जागरूकता पसरवते.

ग्लोबल हलाल सर्टिफिकेशन मार्केट हे फक्त मांस किंवा इतर खाद्यपदार्थांपुरतेच मर्यादित नाही. आता फार्मास्युटिकल्स, कॉस्मेटिक्स, आरोग्य आणि अगदी टॉयलेट उत्पादने हलाल प्रमाणित आहेत. आजच्या तारखेत हलाल फ्रेंडली पर्यटनही होते आणि गोदामालाही हलाल प्रमाणपत्र मिळते. हलाल प्रमाणपत्र रेस्टॉरंट्स आणि प्रशिक्षण संस्थादेखील घेत आहेत. हलाल लॉजिस्टिक्स, मीडिया, ब्रँडिंग आणि मार्केटिंगमध्येदेखील सामील आहे. कोचीस्थित एका बिल्डरने अलीकडेच हलाल-प्रमाणित अपार्टमेंट्स विकण्याची ऑफर दिली होती.



कंपन्या प्रत्येकाला हलाल उत्पादनेच का विकतात?

हलाल बाजाराचे मूल्य 3 ट्रिलियन डॉलर्स (रु. 24,71,38,50,00,00,000) पेक्षा जास्त आहे. त्याची बाजारपेठ दरवर्षी 15-20 टक्के दराने वाढत आहे. यापैकी खाद्यपदार्थांचा वाटा 6-8% आहे. जगातील सुमारे 32 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. त्यामुळे त्यांच्याकडे मोठा ग्राहक वर्ग आहे आणि त्यामुळे उत्पादकांना हलाल प्रमाणपत्र घ्यायला सक्ती केली जात आहे. त्यामुळे उत्पन्न वाढावे यासाठी उद्योजक हलाल प्रमाणपत्र घेत आहेत.

हलालला विरोध करणा-या लोकांचे असे म्हणणे आहे की, हलाल प्रमाणपत्रातून अल्पसंख्याक समुदाय (मुस्लिम) त्यांची इच्छा जगातील बहुसंख्य लोकांवर लादत आहेत. हिंदू वा इतर धर्मातील लोकांनी हलाल प्रमाणित अन्न का खावे? तसेच, हलाल प्रमाणपत्रातून जमा होणारा पैसा कुठे जातो? हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतातील हलाल प्रमाणित उत्पादनांवर दोन प्रश्न वारंवार विचारले जात आहेत.

या प्रश्नांवर चर्चेची गरज आहे. भारतीय सैन्यात २३ वर्षे सेवा केलेल्या सरोज चढ्ढा यांनी टाईम्स ऑफ इंडियावरील त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, सरकारने जर यात हस्तक्षेप केला तर केवळ भारतातील मुस्लिमच नाही तर इस्लामिक जगालाही राग येईल आणि त्यानंतर मुस्लिमांच्या मुलभूत हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा राग आळवणे सुरु होईल.

त्यामुळे हे  हिंदू ग्राहकांनी ठरवावे की हलाल प्रमाणित अन्न घ्यावे की घेऊ नये. हिंदू वा इतर धर्मातील लोकांना असे वाटत असेल की हलाल प्रमाणपत्रामुळे त्यांची फसवणूक होत आहे किंवा त्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत, तर त्यांनी अशी उत्पादने खरेदी करू नयेत. हिंदूंनी झटका मांस घ्यावे. देशाच्या अनेक भागात हलाल प्रमाणपत्राअभावी झटका मांसाची उपलब्धता कमी झाली आहे. हलाल मांस उत्पादनांची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे झटका मांस व्यवसायदेखील हलालकडे वळला आहे.

भारतातील 82% ग्राहक हिंदू आहेत. हलालविरोधातील आंदोलन अधिक तीव्र झाल्यास कंपन्यांना ग्राहकांसाठी दोन प्रकारची उत्पादने करावी लागतील. अशा परिस्थितीत ते अधिक फायदेशीर पर्यायाकडे जातील. त्यामुळे आता हिंदूंनी ठरवावे की हलालच्या मुद्द्याला कसे सामोरे जायचे, याचा मार्ग भारतच दाखवू शकतो.

Halal free Diwali trends on Twitter

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात