Halal and Atheists : मुंबईत होणार हलाल परिषद, तर केरळात लिबरल्सची निरीश्वरवादी परिषद


प्रतिनिधी

मुंबई : एकीकडे भारतात दहशतवादी कारवायांसाठी टेरर फंडिंग करणारी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय वर बंदी घातली जात असताना दुसरीकडे काही वेगळ्या घटना घडताना दिसत आहेत. एकीकडे मुंबईत हलाल परिषद होणार आहे, तर दुसरीकडे केरळमध्ये महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी निरीश्वरवाद्यांनी जगातली सर्वात मोठी परिषद घेण्याचे ठरविले आहे. In Mumbai halal show for spreading parallel Islamic economy and in kerala atheists conclave to spread atheism in God’s own country

जागतिक पातळीवर समांतर इस्लामी अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या मुख्य उद्देशासाठी हलाल संकल्पना मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. कालपर्यंत हलाल संकल्पना केवळ प्राण्यांच्या मांसाशी संबंधी मर्यादित होती, पण ती आता औषधे, सौंदर्य प्रसाधने, हॉटेल इंडस्ट्री, गृहनिर्माण असा बहुतांश क्षेत्रात लागू करून याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. आज याच हलाल अर्थव्यवस्थेने भारतातही पाळेमुळे रोवली असून या समांतर अर्थव्यवस्थेचा अधिकाधिक प्रसार व्हावा, या उद्देशाने मुंबईत चक्क ‘हलाल शो इंडिया’ या नावाने हलाल परिषद आयोजित करण्यात आली आहे.

 हलाल उत्पादनांचा प्रचार प्रसार

१२ आणि १३ नोव्हेंबर २०२२ हे दोन दिवस मरिन लाईन्स येथील इस्लाम जिमखाना येथे ही परिषद होणार आहे. ब्लॉसम मीडिया या संस्थेच्या वतीने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. ब्लॉसम मीडिया ही एकमेव भारतातील अनेकविध संकल्पना राबवणारी संस्था आहे. भारतातील मुसलमान ग्राहक बाजारपेठ वेगाने विस्तारित करण्याच्या उद्देशाने ही संस्था कार्यरत आहे. हलाल उत्पादनांना सर्व व्यासपीठावरून प्रचार प्रसार करण्याची यंत्रणा या संस्थेकडे असल्याचा दावा ब्लॉसम मीडिया संस्थेने केला आहे.

 80 % हिंदूंवर थोपविली इस्लामी अर्थव्यवस्था

सध्या हलालचा विस्तार भारतात मोठ्या प्रमाणात होत आहे. मुसलमान ग्राहक हलाल प्रमाणित वस्तू खरेदी करण्यासाठी आग्रही असल्याने त्यांचा विविध कंपन्यांना फटका बसत आहे. त्यामुळे भारतातील कंपन्याही आता हलाल प्रमाणपत्र घेऊ लागल्या आहेत. हे प्रमाणपत्र हलाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जमियत उलेमा-ए-हिंद हलाल ट्रस्ट आणि जमियत उलेमा-ए-महाराष्ट्र, हलाल कौन्सिल ऑफ इंडिया, ग्लोबल इस्लामिक शरीया सर्व्हिसेस या संस्था देत आहेत, ज्यांचा भारत सरकारशी काहीही संबंध नाही, त्यांचा पैसा थेट इस्लामी अर्थव्यवस्थेकडे जमा होत आहे. विशेष म्हणजे भारतात ८० % हिंदू ग्राहक संख्या असतानाही केवळ १५ % मुसलमानांसाठी ८० टक्के हिंदूंना जबरदस्तीने हलाल प्रमाणित वस्तू खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे युरोपमधील डेन्मार्क, नेदरलँड, स्वीडन, स्वित्झर्लंड, बेल्जियम आणि इंग्लंड आदी अनेक देशांमध्ये हलालला विरोध होऊ लागला आहे, तसा भारतातही याला विरोध सुरू झाला आहे.

 कोचीमध्ये निरीश्वरवादी परिषद

पण एकीकडे मुंबईत हलाल परिषदेची तयारी सुरू असताना दुसरीकडे केरळच्या कोचीमध्ये निरीश्वरवाद्यांची एक महापरिषद महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी 2 ऑक्टोबर रोजी आयोजित केली आहे. तिची जाहिरात देखील परिषदेच्या आयोजकांनी “इन गॉड्स ऑन कंट्री” अशी टोचणारी केली आहे. “गॉड इज इल्युजन” अर्थात देव ही संकल्पना खोटी आहे अशी या निरीश्वरवादी परिषदेची मूलभूत मांडणी आहे. हे निरीश्वरवादी स्वतःला बुद्धिवादी म्हणजे रॅशनॅलिस्ट समजतात. महात्मा गांधी हे सनातनी हिंदू धर्म मानायचे ते स्वतःला वैष्णव जन म्हणून घ्यायचे परंतु त्यांच्या जयंतीदिनी शिवाय “इन गॉड्स ओन कंट्री” अशी जाहिरात करून जगातली सर्वात मोठी निरीश्वरवादी महापरिषद केरळमध्ये घेतली जात आहे. या परिषदेला 10000 निरीश्वरवादी हजर राहणे संयोजकांना अपेक्षित आहे.

In Mumbai halal show for spreading parallel Islamic economy and in kerala atheists conclave to spread atheism in God’s own country

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण