‘या’ मालमत्ता करण्यात आल्या आहेत जप्त
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताच्या तपास यंत्रणेने खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूवर कडक कारवाई केली. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पन्नूवर मोठी कारवाई केली. एजन्सी गुरपतवंत सिंग पन्नू विरुद्ध दाखल झालेल्या 6 प्रकरणांची चौकशी करत असून या अंतर्गत त्यांची भारतातील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ पाच बचत योजनांवर FD पेक्षा जास्त मिळत आहे व्याज!
NIA टीम खलिस्तानी दहशतवादी आणि शीख फॉर जस्टिस (SFJ) प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या विरोधात दाखल झालेल्या 6 प्रकरणांची चौकशी करत आहे. याअंतर्गत एनआयएने कारवाई करत पन्नूच्या चंदीगडमधील 3 मालमत्ता जप्त केल्या आहेत. याशिवाय अमृतसरमध्ये पन्नूच्या काही जमिनीही जप्त करण्यात आल्या आहेत. या वर्षी 15 ऑक्टोबरपर्यंत तपास यंत्रणेने पन्नूविरोधात एकूण 66 गुन्हे दाखल केले आहेत.
तपास यंत्रणेने पन्नूविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी केली होती. खलिस्तानी दहशतवादी पन्नू रोज सोशल मीडियावर भारताविरोधात बोलत असतो. तो अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता, त्यामुळे त्याच्यावर देशद्रोहाचा खटलाही प्रलंबित आहे. या क्रमाने NIA ने शुक्रवारी त्यांची मालमत्ता जप्त केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App