‘मन की बात’बद्दल केलेलं ‘ते’ ट्वीट आम आदमी पार्टीचे नेते इसुदान गढवींना भोवलं!


गुजरात पोलिसांनी केला गुन्हा दाखल; जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : आम आदमी पार्टीचे गुजरात अध्यक्ष इसुदान गढवी एका ट्विटमुळे अडचणीत आले आहेत. इसुदान गढवी यांनी पंतप्रधान मोदींच्या मन की बात कार्यक्रमाच्या बजेटबाबत दावा ट्विट केला होता, जो योग्य आकड्यांवर आधारित नव्हता, त्याच्या समर्थनार्थ कोणतेही आकडे किंवा कागदपत्रे दिलेली नाहीत, त्यानंतर आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Gujarat Police registered a case against Aam Aadmi Party leader Isudan Gadhvi for wrongly tweeting about Mann Ki Baat

गुजरात पोलिसांनी आम आदमी पार्टीचे गुजरात अध्यक्ष इसुदान गढवी यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या 100 भागांवर 830 कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा गढवी यांनी केला होता.

एका अधिकार्‍याने सांगितले की, गढवी यांनी कोणत्याही संबंधित डेटाशिवाय हा दावा केल्याचे आढळून आल्यानंतर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे नंतर गढवी यांनी हे ट्विट डिलीट केले. तर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीने आरोप केला की सत्ताधारी भाजपा अशा “खोट्या” एफआयआर द्वारे आमच्या नेत्यांना त्रास देत आहे.

गढवी यांनी २८ एप्रिल रोजी ट्विट करून दावा केला होता-

“मन की बातच्या एका एपिसोडवर ८.३ कोटी रुपये खर्च झाले आहेत. याचा अर्थ केंद्राने आतापर्यंत १०० एपिसोडवर ८३० कोटी रुपये खर्च केले आहेत. हे खूप जास्त आहेत. भाजपा कार्यकर्त्यांनी आपला निषेध नोंदवावा, कारण जास्तकरून तेच हा कार्यक्रम ऐकतात.” असं गढवींनी म्हटलं होतं.

या ट्विटची दखल घेत अहमदाबाद सायबर गुन्हे शाखेने २९ एप्रिल रोजी गढवी यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत एफआयआर नोंदवला होता, असे सायबर क्राइमचे सहायक पोलीस आयुक्त जेएम यादव यांनी सांगितले.

यादव म्हणाले “सरकारच्यावतीने पोलिस तक्रारदार आहेत. गढवी यांनी त्यांच्या दाव्याला पाठिंबा देण्यासाठी कोणताही विश्वासार्ह डेटा न देता मन की बात विरोधात ट्विट केल्याचे आढळल्यानंतर सायबर गुन्हे शाखेने २९ एप्रिल रोजी एफआयआर दाखल केला. आम्ही अधिक पुरावे गोळा करू आणि नंतर पुढील कारवाई करू, त्यांना अद्याप अटक झालेली नाही.

Gujarat Police registered a case against Aam Aadmi Party leader Isudan Gadhvi for wrongly tweeting about Mann Ki Baat

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात