विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : अदानी समूहाकडे मालकी असलेल्या गुजरातमधील मुंद्रा पोर्टवरुन तीन हजार किलोचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. अफगाणिस्तानवरुन दोन कंटेनरच्या माध्यमातून आलेले हेरॉईन हे तब्बल 15 हजार कोटी किंमतीचे असल्याचे सांगितले जात आहे. ही कारवाई केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या आणि कस्टम विभागाच्या वतीनं 15 सप्टेंबरला करण्यात आली. या प्रकरणात व्यवस्थापनाला फायदा झालाय का? याची चौकशी करा, असे आदेश गुजरात न्यायालयानं दिले आहेत. Gujarat High Court orders probe into heroin case in Mundra port
गुजरातमधील नारकोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक पदार्थांसाठीच्या विशेष न्यायालयाने महसूल गुप्तचर संचालनालयाला (डीआरआय) निर्देश दिले आहेत की, मुंद्रा अदानी बंदर, त्याचे व्यवस्थापन आणि त्याच्या प्राधिकरणाने जप्त केलेल्या 2,990 किलो हेरॉईनच्या आयातीतून बंदर व्यवस्थापनाला काही फायदा झाला आहे का?
कोयंबटूरचा रहिवासी असलेल्या राजकुमार पी आणि भारतीय कंपनी आणि इराणी निर्यातदार यांच्यातील कराराची दलाली करण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करणाऱ्या प्रमुख आरोपींच्या रिमांड अर्जावर सुनावणी करताना न्यायायालयाने म्हटले आहे की, हे तपासले जाणे आवश्यक आहे की मुंद्रा अदानी बंदराच्या प्राधिकरण आणि अधिकाºयांची भूमिका काय आहे. हे कंटेनर भारतात उतरले त्याबाबत व्यवस्थापन, प्राधिकरण आणि अधिकारी पूर्णपणे अंधारात होते आणि अनभिज्ञ होते का? परदेशातून आणि मुंद्रा बंदरात अशा कंटेनर आणि माल स्कॅनिंग आणि तपासण्याच्या पद्धती आणि प्रक्रिया तपासली पाहिजे.
डीआरआय अहमदाबादने 16 सप्टेंबर रोजी मुंद्रा बंदरातील दोन कंटेनरमधून हेरॉईन जप्त केले. यामध्ये पावडरच्या स्वरुपातील हेरॉईन होते. ते अफगणिस्थानातून आणण्यात आले होते. इराणच्या बंदर अब्बास बंदरात हे कंटेनर भरले गेलेहोते. आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथे नोंदणीकृत आशी ट्रेडिंग कंपनीने हसन हुसेन लिमिटेड नावाच्या फर्ममधून आयात केले होते.
न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांत, गुजरातमधील समुद्र, विशेषत: कच्छ जिल्ह्याचा सागरी परिसर, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सारख्या देशातून मोठ्या प्रमाणात तस्करीचा अड्डा बनला आहे. त्यामुळे डीआरआयने आश्री ट्रेडिंगविरोधात दाखल केलेल्या खटल्याच्या सर्व बाबींचा तपास करावा. त्याचबरोबर मुंद्रा अदानी बंदराचे व्यवस्थापन आणि अधिकारी यांचीही चौकशी करावी.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App