विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : भारतात जोपर्यंत हिंदू धर्मीय बहुसंख्याक आहेत तोपर्यंतच या देशात घटना, धर्मनिरपेक्षता आणि कायदा टिकून राहील. माझे शब्द लिहून ठेवा असे गुजरातचे मुख्यमंत्री नितीन पटेल यांनी म्हटले आहे. Gujarat Deputy Chief Minister Nitin Patel says write down
गांधीनगर येथील भारतमाता मंदिरामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या वतीने झालेल्या सोहळ्यात बोलताना नितीन पटेल बोलत होते. ते भारतातील पहिले मंदिर असल्याचे मानले जाते. ते म्हणाले की, घटना, धर्मनिरपेक्षता आणि कायदा हे तोपर्यंत चालतील जोपर्यंत हिंदू बहुसंख्याक आहेत. माझे शब्द लिहून ठेवा, जर हिंदूंची संख्या कमी झाली तर त्या दिवशी ना कुठलीही कोर्ट कचेरी असेल. ना कुठला कायदा असेल, ना कुठली लोकशाही असेल, ना कुठली घटना असेल, सर्व काही हवेत दफन होऊन जाईल.
पटेल म्हणाले ज्या दिवशी दुसऱ्यांची लोकसंख्या वाढेल त्यादिवशी धर्मनिरपेक्षताही राहणार नाही. लोकसभा वाचणार नाही आणि घटनाही टिकणार नाही. सगळे काही दफन केले जाईल.
पटेल असेही म्हणाले की मी हे सगळ्यांसाठी म्हणत नाही. लाखो ख्रिश्चन, लाखो मुसलमानही देशभक्त आहेत. गुजरात पोलीस दलात हजारो मुसलमान आहेत आणि ते देशभक्त आहेत.
गुजरातमधील धर्मांतरविरोधी कायद्याबाबत बोलताना पटेल म्हणाले की, उच्च न्यायालयाने या कायद्यातील काही कलमांना स्थगिती दिली आहे. याविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App