दिल्लीत GRAP-4 सुरूच राहणार, मंत्री गोपाल राय म्हणाले, ”प्रदूषणासाठी उत्तर प्रदेश, हरियाणा जबाबदार”

BS-III पेट्रोल वाहने आणि BS-IV डिझेल वाहनांवर बंदी असेल.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिवाळीत राजधानीत फटाके फोडल्यामुळे प्रदूषणात अचानक वाढ झाल्यानंतर पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी सोमवारी दिल्ली सचिवालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. याबैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गोपाल राय यांनी हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांनार वाढत्या प्रदूषणाला जबाबदार धरले.GRAP4 will continue in Delhi says minister Gopal Rai Uttar Pradesh Haryana responsible for pollution

माध्यमांशी संवाद साधताना पर्यावरण मंत्री म्हणाले की, दिल्ली-एनसीआरमध्ये ग्रिड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन-4 (GRAP-4) अंतर्गत निर्बंध कायम राहतील. राजधानीतील धूळ विरोधी मोहीम पुढील 15 दिवसांसाठी वाढवण्यात आली आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद राहणार आहेत. मुलांच्या सुट्या वाढवण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.



तसेच, गोपाल राय म्हणाले, ‘सीएक्यूएम (कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंट) चे पुढील आदेश येईपर्यंत GRAP IV नियमांतर्गत प्रदूषण-विरोधी उपाय दिल्लीत लागू राहतील. या अंतर्गत BS-III पेट्रोल वाहने आणि BS-IV डिझेल वाहनांवर बंदी असेल. अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे ट्रक आणि अत्यावश्यक सेवांशी जोडलेले ट्रक वगळता इतर सर्व ट्रक्सवर दिल्लीत बंदी घालण्यात आली आहे.

प्रदूषणाला जबाबदार कोण? –

दिवाळीत दिल्लीत फटाके फोडण्याबाबत पर्यावरण मंत्री म्हणाले, “दिल्लीत फटाक्यांच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर बंदी आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणामधून फटाके दिल्लीत आणले गेले. भाजपच्या ताब्यात दिल्ली, हरियाणा आणि यूपीचे पोलिस आणि या तिन्ही पोलिस दलांची पाळत असल्याने कोणताही सामान्य माणूस सहजासहजी फटाके वाजवू शकत नाही. काही खास लोकांनी हे केले आहे.

GRAP4 will continue in Delhi says minister Gopal Rai Uttar Pradesh Haryana responsible for pollution

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात