ओबीसी संघटनांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा विषय निदर्शनास आणून दिला होता.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : समाजातील अनेक होतकरू, गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची इच्छा असते, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना त्यांच्या स्वप्नांना मुरड घालावी लागते. मात्र विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी आणि सरकारकडून मोठा निर्णय घेतला गेला आहे. ज्याप्रमाणे सरकार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करते त्याप्रमाणे आता ओबीसी समजातील पात्र विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परेदशात जाता येणार आहे. त्यासाठी सरकारकडून विशेष शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. याचा लाभ २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.
ओबीसी संघटनांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हा विषय निदर्शनास आणून दिला होता. यानंतर यासंदर्भातील शासन निर्णय 26 सप्टेंबरलाच राज्य सरकारने जारी केला आहे. शिवाय पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती,इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील पात्र 75 विद्यार्थ्यांना 2024-25 या वर्षासाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी शिवष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे.
Chatrapati Shivaji Maharaj : शिवजयंतीपूर्वी सिंधुदुर्गात छत्रपती शिवरायांचा भव्य दिव्य पुतळा उभारणार!!; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
परदेशात उच्च शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती योजना राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 2019-20 पासून लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांची संख्या 75 इतकी अंतिम करण्यात आली. त्यानुसार 2024-25 या वर्षाकरिता परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज मागविण्यात आले होते.
मागास बहुजन कल्याण संचालनालयाचे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने या अर्जांची छाननी केली आहे. त्यानंतर अर्जांतील त्रुटींची पूर्तता करून अभ्यासक्रमनिहाय गुणवत्ता यादी तयार केली. ही यादी 10 सप्टेंबरला राज्य सरकारला सादर केली. यानंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने 23 सप्टेंबरला झालेल्या बैठकीत पात्र 75 विद्यार्थ्यांची निवड केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App