विशेष प्रतिनिधी
कोलकता : निवडणुकीनंतरच्या हिंसाचारामुळे पश्चिम बंगालमधील स्थिती भयंकर बनल्याचे मत राज्यपाल जगदीप धनकर यांनी व्यक्त केले. धनकर यांनी उत्तर बंगालचा तब्बल एका आठवड्याचा दौरा सुरु केला. पहिल्याच दिवसी त्यांनी ममता यांच्या नेतृत्वाखालील सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, हिंसाचारामुळे मी चिंतित आहे. हे मान्य होण्यासारखे नाही. अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे लोकशाही व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. Governor targets Mammata Banaerjee
धनकर यांनी त्यांनी उत्तर बंगालचा दौरा करण्याला महत्त्वाचा संदर्भ आहे. दौऱ्याच्या उद्देशांबाबत त्यांनी कोणताही तपशील दिलेला नाही, पण हा भाग केंद्रशासित प्रदेश करावा अशी मागणी भाजपच्या काही खासदारांनी केली आहे. हिंसाचाराच्या तक्रारींची हाताळणी करण्याच्या पद्धतीवर त्यांनी टीका केली. इतके आठवडे उलटून गेले तरी सरकारचा सत्य नाकारण्याचाच दृष्टिकोन आहे, असा दावा त्यांनी केला. मतदानाच्यावेळी हिंसाचार झालेल्या ठिकाणांचा धनकर यांनी निवडणूक निकालानंतर दौरा केला होता. तेव्हा उत्तर बंगालमधील कुचबिहार येथे हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App